स्वातंत्र्याची विनवणी
स्वातंत्र्य
तुडवलं जातंय
यथेच्छ
मूठभर श्वापदांच्या
सनातनी पायांखाली.
स्वातंत्र्य
रक्तबंबाळ होतंय,
विव्हळतंय;
पुन्हा पुन्हा
विनवणी करतंय
मुक्तीसाठी.
ज्यांच्या रक्तात
ठासून भरलेली आहे
माणुसकीची बारूद
अशाच माणसांचं
हवं आहे गाव
स्वातंत्र्याला;
जेथे
त्याला असेल
मुक्त संचारण्याची मुभा
काळाच्या आरपार…!
– मिलिंद हिवराळे
सादिक नगर, मु.पो.ता. बार्शिटाकळी,
जि. अकोला – 444401 (म.रा.)
भ्र. 7507094882
ईमेल : milindhiwarale@yahoo.com
………………..