आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस

आज बँक ऑफ बडोदा स्थापना दिवस

स्थापना : २० जुलै १९०८
बँक ऑफ बडोदाची स्थापना बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड महाराजांनी २० जुलै १९०८ मध्ये केली. बडोदा मधील बाजारपेठेतल्या एका छोट्याशा दुकानगाळ्या मध्ये बडोद्या मधली पहिली बँक सुरु झाली. सयाजी गायकवाड महाराजांनी बँक ऑफ बडोदाची पहिली डिपॉजीट करून बँकेची अधिकृत सुरवात केली होती. कोणताही राजा त्याकाळी बँक वगेरे काढत नसे, पण सयाजीराव यांची दूरदृष्टी होती की, त्यांनी अर्थकारणाला चालना देण्यासाठी बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून शाश्वत दिशेनी पावलं टाकली. महाराजांच्या डोक्यात बँकेचा विचार येताच त्यांनी गुजरात मधील बड्या व्यावसाईकाना विश्वासात घेतले. त्यात संपतराव गायकवाड, राल्फ व्हाईटन्याक, विठलदास ठाकरसी, तुलसीदास कालीचंद आणि एन.एम. चोक्सी ही सर्व मंडळी होती. त्यावेळी तत्कालीन गुजरातचे अर्थकारण याच लोकांभोवती फिरत होते त्यामुळे चाणाक्ष महाराजांनी आधी यांना बरोबर घेतले आणि मग २० जुलै १९०८ रोजी महाराजांनी बँक ऑफ बडोदाची स्थापना केली.
बँकेचे पहिली शाखा मांडवी (बडोदा) मध्ये उघडली गेली. दोनच वर्षात बँकेने दुसरी शाखा अहमदाबाद इथे काढली गेली. त्यानंतर मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली इथे बँकेने शाखा काढल्या. बँक खऱ्या अर्थानी वाढली ती दुसऱ्या महायुद्धा नंतर. १९५३ मधेच बँक ऑफ बडोदाने हिंदी महासागर ओलांडून केनिया आणि युगांडा या देशात रहाणाऱ्या भारतीयांसाठी मोंबासा आणि कम्पाला या दोन्ही ठिकाणी स्वतःच्या शाखा काढल्या. लगेच पुढचाच वर्षी बँकेने केनियाची राजधानी नैरोबी आणि टांझानिया या ठिकाणी ही शाखा काढल्या. १९५७ मध्ये बँकेने मोठा धाडसी पाउल घेतले ते म्हणजे लंडन मध्ये शाखा काढण्याचा. लंडन त्याकाळी जगाचे आर्थिक केंद्र होते. सन १९५८ मध्ये बँक ऑफ बडोदाने पहिली बँक कलकत्त्यातील ‘हिंद बँक’ अधिग्रहित केली. १९६१ मध्ये महाराष्ट्रात चांगले जाळं असणारी ‘न्यू सिटीजन बँक ऑफ इंडिया’ ही बँक अधिग्रहित केली. त्याच वर्षी मोरेशियास आणि फिजी या देशांमध्ये बँकेने काम चालू केले. असं करत करत बँकेची भारतात आणि भारता बाहेर घौडदौड चालूच राहिली.
१९७४ मध्ये बँकेने अबू धाबी आणि दुबई मध्ये काम चालू केले आणि मध्य पूर्व मध्ये हि स्वतःचे स्थान बळकट केले. कालानुरूप बँक संधी दिसेल तिथे कामकाज सुरु करू लागली आणि स्वतःचे पंख पसरत राहिली. १९ जुलै १९६९ साली बँक ऑफ बडोदाचे राष्ट्रीयीकरण झाले. १९९६ साली बँकेने एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे कॅपिटल मार्केट मध्ये उतरण्याचा आजही भारत सरकार ची ६६ टक्के भागीदारी या बँकेत आहे. जगभरात पसरलेल्या गुजराती व्यापार्यांनी या बँकेला भारता बाहेर वाढवले. सिबिल स्कोअरच्या आधारे व्याजदर निश्चित करणारी बँक ऑफ बडोदा ठरली देशातील पहिली बँक ठरली. देना बँक, विजया बँक आणि बँक ऑफ बडोदा यांच्या एकत्रीकरणामुळे बॅंक ऑफ बडोदा ही एसबीआय आणि एचडीएफसी बॅंक यांच्या नंतर देशातील तिसरी मोठी बॅंक झाली आहे.
आज बॅंक ऑफ बडोदाच्या एकूण शाखा ९५०० पेक्षा जास्त आहेत. १३,४०० ATM आहेत तर एकूण ८५,००० जण बँकेत काम करतात. जगभरात आज बारा लाख ग्राहक आहेत. बँक आज CSR फंडा मार्फत महाराजांचा सामाजिक कामाचा वारसा ही जपत आहे. CSR अंतर्गत समाजातील दुर्बल घटकांसाठी काम करत आहे. बडोदा अमादमी च्या माध्यमातून अनेक ट्रेनिग प्रोग्राम बँक आयोजित करत असते. २०१९ च्या फोर्बेस च्या ग्लोबल २००० बँकांच्या यादीत बँक ऑफ बडोदाचा ११४५ वा नंबर आहे. बँकेची एकूण मालमता आजच्या घडीला तीन खरब रुपये (3 Trillion Rs) इतकी आहे.
– संजीव वेलणकर, पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण