विभागीय आयुक्त करणार मेळघाटातील आरोग्य यंत्रणांची पाहणी
अमरावती, : मेळघाटातील आरोग्य सुविधा, मनुष्यबळ उपलब्धता, नागरिकांच्या गरजा आदी विविध बाबींचा विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय या आरोग्य केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी उद्या दि. 7 जुलै रोजी करुन आढावा घेणार आहेत.
या पाहणी दरम्यान अचलपूर व धारणी येथील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभागाचे अधिकारी आदी सहभागी होणार आहेत. मेळघाटातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व स्टॉफने आपल्या आरोग्य केंद्रावर उपस्थित राहावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील पायाभूत सुविधा, औषधी, लसींची उपलब्धता, रुग्णवाहीका आदी बाबींची तपासणी करण्यात येईल. नागरिकांच्या तक्रारींवरही निर्णय घेतला जाईल. मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापन संदर्भात स्थानिक प्रशासनाकडून त्या आढावा घेतील.