• Mon. Sep 25th, 2023

समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात चिंताजनक

समृद्धी महामार्गावर वारंवार होणारे अपघात चिंताजनक

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर महामार्गावरील अपघातांची मालिका सतत सुरूच आहे.मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या दरम्यान प्रवासासाठी लागणार वेळ कमी झाला आहे. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.आता पर्यन्त जेवढे अपघात या महामार्गावर झाले त्यातील बुलठाना जिल्ह्यातील शिंडखेज राजा जावळील पिंपळखुटा या गावाजवळ झालेला अपघात अतिशय भीषण होता.या अपघातात होरपळून २५.जणांचा मृत्यू झाला.
सिंधखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर आदळली. आणि हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामुळे बस पलटी झाली आणि बसला अचानक आग लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधून प्रवास करणाऱ्या २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत.
या अपघातामध्ये बस जाळून खाक झाली आहे.

अपघाताचे मुख्य कारण –

समृद्धी महामार्गावरवरील अपघातासाठी’महामार्ग संमोहन’जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्याच अडथळ्यांशिवाय जेव्हा एखादा महामार्ग सरळ एका रेषेत असतो.त्या महामार्गावर तुमची गाडी सरळ एकमार्गे एकाच वेगात अनेक मिनिटे धावत असते.अशा परिस्थिती मध्ये तुमच्या शरीराची हालचाल स्थिर होते,तुमचा मेंदूदेखील क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्या मानवी स्थितीला’महामार्ग संमोहन’असे म्हणतात. हा प्रकार समृद्धी महामार्गावर चालकांसोबत घडत आहे. समृद्धी महामार्गावर गाडी चालवतांना अनेक चालक हे’महामार्ग संमोहनाचे’बळी ठरले आहे.
समृद्धी महामार्गावर दिवसाला सरासरी ९अपघात होतात. गेल्या तीन महिन्यात अपघातात ३७ मृत्यू झाले आहेत. गंभीर स्वरुपाचे११२अपघात झालेत. यात सकाळी ८ते१०दरम्यान३४टक्के अपघात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर महामार्ग संमोहनमुळे म्हणजे एकसारखे ड्रायव्हिंगमुळे३२टक्के अपघात झाल्यांचं नोंद झाली आहे. टायर फुटल्यामुळे ३४टक्के तर लेन चेंज करताना४०टक्के अपघात झाले आहे. चालकाचं लक्ष विचलित झाल्याने २४टक्के अपघात झाले असून यात८टक्के अपघात हे मोबाईल हाताळताना झाले असल्याची नोंद आहे.
‘लेन कटिंग’ हे समृद्धी महामार्गावर अपघाचे आणखी एक प्रमुख कारण आहे. समृद्धी महामार्गावर तीन पदरीचे दोन स्वतंत्र ट्रॅक आहे. त्यामुळे समोरासमोर वाहन धडकून अपघात घडण्याचा प्रश्न नाही. मात्र आजवर झालेले बहुतांश अपघात हे साईड डॅशमुळे झाले आहे. समोरच्या वाहनाचा चालक आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जातांना नियमाचे पालन करत नाही. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या सुसाट वाहनासाठी समोरच्या वाहनांची ही अनपेक्षित मुव्हमेंट असते. त्यातच महामार्ग संमोहनची क्रिया काम करत असल्याचे चालकाला सतर्क व्हायला एका सेकंदाची ही संधी मिळत नाही. त्यामुळे साईड डॅश होतो आणि त्यानंतर भीषण अपघात होत असल्याचे या संशोधनात पुढे आले आहे. आजवर झालेल्या अपघातात 40 टक्के या साईड डॅशमुळे झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अति वेगामुळे अपघात

समृद्धी महामार्गावर ३० टक्के छोटी वाहने व २० छोटी मालवाहू वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे संशोधनात पुढे आले आहे. त्यातच ५१ टक्के ट्रकचालक हे लेन फालो करत नसल्याचे पुढे आले. त्यातच समृद्धी महामार्गावर वळण मोजके असली तरी त्यांचा घेरा मोठा आहे. त्यामुळे चालक सरळ रोड समजून वाहन सरळ रेषेत पुढे नेतो. त्यामुळे चालकांकडून लेन फॉलो न झाल्याने देखील अपघात झाल्याचे संशोधनात पुढे आले आहे. याला असिव्ह ड्राईव्ह असे म्हणतात. हे ११ टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. कमजोर किंवा कालबाह्य टायर वापरले जात असल्याने सिमेंट रोडवर टायर फुटणे हे देखील ३४ टक्के अपघाताला कारणीभूत ठरले आहे. सोबत काही कारणाने चालकाचे लक्ष विचलित झाल्याने २४ टक्के अपघात झाले तर मोबाईलचा वापर ८ टक्के अपघाताला कारणीभूत ठरला आहे. या सर्वांमध्ये अतिवेग हा समान धागा असल्याचे या संशोधनात दिसून आले.

अपघात टाळण्यासाठी उपाय

ड्रायव्हिंग करताना एकसुरीपणा टाळण्यासाठी ठिकाठिकाणी साईन बोर्ड,स्क्रीन डिस्प्ले लावणे,
वाहनांच्या टायरमध्ये नायट्रोजन हवा असणं,
गाड्यांमध्ये समोरील एअर बलून बरोबर साइड सेफ्टी आवश्यक
वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्याची.विसावा घेण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल
९५६१५९४३०६

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,