
आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकार ; जयेश राऊत यांच्यावर मुंबई येथे मोफत शस्त्रक्रिया
राऊत परिवाराला मिळाला दिलासा ; आमदार देवेंद्र भुयार यांचे मानले आभार !
वरुड (तालुका प्रतिनिधी ): मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार वरुड मोर्शी तालुक्यातील रुग्णांचा ईलाज करण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णसेवा देण्यासाठी नेहमी तत्पर असतात, आमदार देवेंद्र भुयार यांनी ज्या गरिबांजवळ असाध्य रोगांवर उपचार करवून घेण्यासाठी पैसा नाही, अशा रुग्णांना मदत करत आहे. त्यांनी आदिवासी व ग्रामीण भागांत राहणार्या गरीब व कोणीही वाली नसलेल्या रुग्णांना स्वास्थ्य सुविधा पुरवविण्याचे काम करीत आहे.
वरुड तालुक्यामधील उदापूर गावातील ब्रेन ट्युमर असलेल्या १४ वर्षाच्या जयेश भारत राऊत यांच्यावर आमदार देवेंद्र भुयार यांच्या पुढाकाराने एस आर सी सी हॉस्पिटल हाजी अली मुंबई येथें मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी रुग्णसेवेचा वसा जोपासत अनेक रुग्णांचे जीवन सुकर केले आहे. वरुड तालुक्यातील उदापूर येथील १४ वर्षांचा चिमुकला जयेश भारत राऊत याचे ब्रेन ट्युमर असल्याचे निदान झाल्यानंतर शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शास्त्रक्रिये करिता सुमारे ६ लक्ष रुपये खर्च येणार असल्याचे लक्षात आल्यानंतर काबाडकष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या भारत राऊत यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला.
याबाबत राऊत कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्याशी संपर्क साधून आपली व्यथा मंडली असता जयेशच्या आई- वडिलांच्या परिस्थितीची जाणीव आमदार देवेंद्र भुयार यांना असल्यामुळे त्यांनी जयेश भारत राऊत याला मुंबई येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करून सुमारे ६ लक्ष रुपयांची ब्रेन ट्युमर ची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्यामुळे राऊत कुटुंबीयांना दिलासा मिळाला असून आमदार देवेंद्र भुयार यांच्या सहकार्याने जयेश वर मोफत शस्त्रक्रिया झाल्याने राऊत कुटुंबीयांनी आमदार देवेंद्र भुयार रुग्णसेवक पंकज ठाकरे यांचे आभार मानले.