• Tue. Sep 19th, 2023

औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचा व वृक्षाचा 7 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात व हर्षोल्हासात संपन्न

उमरखेड (प्रतिनिधी ) : औदुंबर नगरी हिरवीगार व्हावी व नागरिकांचे आरोग्य निरोगी राहावे या उदात्त हेतूने स्थापन झालेल्या औदुंबर वृक्ष संवर्धन समितीने आज दिनांक 26 जून 2023 रोजी अनेक मान्यवरांच्या उपस्थित वृक्षाचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करीत एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबविला ,याप्रसंगी आपले आरोग्य निरोगी रहावे व पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या दुहेरी उद्देशाने आयुष्यभर सायकल चालवून पर्यावरण बचाव चा संदेश देणारे औदुंबर नगरीतील श्री परमेश्वर मामीडवार सर, श्री सुभाष देशमुख सर, श्री गिरीश कुबडे, श्री बापूराव दिघेवार, औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे जेष्ठ सदस्य श्री अक्रम अली यांचा अजीवन सायकल चालक म्हणून शाल, श्रीफळ व वृक्ष देऊन गौरव करण्यात आला. श्री संतोष घुगे केंद्रप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते श्री शेवंतराव गायकवाड, व औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे जेष्ठ सदस्य आक्रमअली यांचा वृक्ष लागवड करून व केक कापून वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीतज्ञ श्री राजेश्वर रायेवार साहेब, प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार श्री विजयराव खडसे साहेब, कृषी शास्त्रज्ञ श्री विजयराव माने साहेब, माजी सैनिक श्री बरडे, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी श्री नारायण वड्डे, माजी शिक्षण सभापती श्री प्रकाश दुघेवार सर,डॉ जयशंकर जवणे, श्री विजय गुजरे सर,श्री पंकज तुप्तेवार वृक्षप्रेमी पुणे तसेच औदुंबर नगरीतील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, वृक्षप्रेमी उपस्थित होते.

औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे अविरत कार्य चालू राहण्याकरिता आज पंकज व सागर तुप्तेवार बंधू यांनी 2000 रुपये, श्री परमेश्वर मामिडवार सर 500 रुपये,श्री सुभाष देशमुख सर 500 रुपये, शेवंतराव गायकवाड 500 रुपये संतोष घुगे सर 500 रुपये, गजानन व्यवहारे (किर्ती एम्पोरियम)500 रुपये, नंदकिशोर शर्मा 500 रुपये, डॉ. धनंजय व्यवहारे 500 रुपये वृक्ष निधी दिला त्यांचे मनःपूर्वक आभार सर्व मान्यवरांनी औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक करून कार्यास शुभेच्छा दिल्या व यापुढेही तनमनधनाने सर्वतोपरी सहकार्य करण्याचा विचार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दिलीप भंडारे प्रास्ताविक औदुंबर वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर खांडरे सर व आभार प्रदर्शन श्री प्रकाश शेळके यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता औदुंबर वृक्ष संवर्धन समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,