• Wed. Jun 7th, 2023

राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये नेमकं चाललंय काय….?

मुंबई (प्रतिनिधी) : गेली कित्येक वर्षे राज्याच राजकारण ज्या व्यक्ती भोवती फिरत होत ती व्यक्ती म्हणजे राष्ट्रवादी चे सर्व्हे सर्व्हा आदरणीय शरद पवार . त्यांचं राजकारण नेहमी बेरकी ,आणि बेभरवशी राहील , मनात काय चालू आहे हे ते कधी बोलणार नाही आणि जे बोलणार ते कधी करणार नाही. हा त्यांचा आजवरचा राजकीय इतिहास जरी असला तरी ही आता त्यांचं वय ” आणि पक्षा मध्ये सगळं आलबेल नाही हे सांगण्यासाठी कोणी जोतिष्या ची गरज नाही.
सुप्रिया ताई आणि अजित दादा हे दोन गट राष्ट्रवादी मध्ये सक्रिय आहेत. आणि ते आजवर झाकून राहिलेलं नाही.अजित दादा यांना मानणारे आमदार समोर येत जरी असले तरी सुप्रिया ताई यांच्या गटात असलेले जयंत पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील. यांचं ही सुप्रिया ताई यांच्या पाठी असणं लपून राहील नाही. त्या मुळे ही लढाई सुप्रिया सुळे आणि अजित दादा यांच्यात आहे का ? तर ह्याच उत्तर हो ही आहे आणि नाही देखील आहे. कारण सुप्रिया ताई ह्या खासदार आहेत तर दादा आमदार , अजित दादा यांना दिल्ली नको आहे. परंतु सुप्रिया ताई यांना राज्यात त्यांच्या जवळीक असलेल्या नेते मंडळी मूळे सहाजिकच राज्यात ही दबदबा हवा आहे. राज्यात मात्र अजित दादा यांचा शब्द अंतिम हवा अस अजित दादा यांना वाटत असून मुख्यमंत्री पदी बसण्याच त्याच स्वप्न लपून राहिलेलं नाही.
दुसर म्हणजे राष्ट्रवादी मध्ये जो सुप्त वाद चालू आहे .त्यात जयंत पाटील , आणि अजित दादा यांच्या मध्ये असणार शीतयुद्ध ही कारणीभूत आहे. ज्या वेळी अजित दादा यांचे भावी पोस्टर लागले जातात त्या वेळी राष्ट्रवादीचे खासदार
म्हणतात जयंत पाटील मुख्यमंत्री हवे. इथं ही कळत सगळं आलबेल नाही. अजित दादा यांच्या हाती पक्ष द्यावा तर पक्षातील अजित दादा यांच्या शी सख्य नसणारे केवळ पवार साहेब , समोर ठेऊन राष्ट्रवादीत असणारे नेते जे अजित पवार यांच्या कडे पक्ष गेल्यास , दुसरा पर्याय निवडतील. तर दुसरा कुणी राष्ट्रवादी अध्यक्ष झाल्यास कदाचित अजित पवार पुन्हा बंड करू शकतात , त्या मुळे नेमकं अध्यक्ष पद द्यायचं कोणाकडे? ज्या मूळे पक्ष अध्यक्ष पद सोडतोय म्हणत शरद पवार यांनी ही गुगली तर टाकली नाही. आणि ह्या गुगली वर नेमकं कोण बोल्ड झालं अस जर विचारलं तर उत्तर सोपं आहे . राज्यातील भाजप नेते , त्यांचे पडलेले चेहरे सगळं सांगून जात आहेत. कदाचित दिल्लीत बोलणी ही सुरू झाली नाहीत ना ! अस त्यांना वाटत असेल..!

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *