• Mon. Jun 5th, 2023

आता तरी ब्रेक घ्या…!

*आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण…..
आजच्या काळात मोबाइल फोन वापरणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला मोबाइल दिसतो मग भले तो सुशिक्षित असो की अशिक्षित.आपण नेहमी पाहतो की आपल्या आसपास कित्येक लोक तासनतास मोबाइल फोनवर बोलत असतात पण त्यामुळे दीर्घकाळानंतर त्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. मोबाइलच्या अतिवापरामुळे बऱ्याचदा असे म्हटले जाते की, ”मोबाइल ही गरज राहिलेली नसून व्यसन झाले आहे.” याचाच प्रत्यय देणारी माहिती सध्या एका संशोधनातून समोर आली आहे.
*जास्त वेळ मोबाइल फोन वापरण्यामुळे वाढू शकतो उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका…
मोबाइलचा वापर करणे गरजेचे आहे पण त्याच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या निरोगी जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनातून समजले आहे की, दर आठवड्याला ३० मिनिटे म्हणजेच अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ मोबाइल फोनवर बोलण्यामुळे उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका १२ टक्क्यांनी वाढतो.
१० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या जागतिक लोकसंख्येपैकी जवळजवळ तीनचतुर्थांश लोकांकडे मोबाइल फोन आहे. मोबाइल फोन रेडिओ फ्रिक्वेन्सी ऊर्जेच्या कमी पातळीचे उत्सर्जन करतात, ज्याचा संबंध अल्पकालीन संपर्कानंतर रक्तदाब वाढण्याशी जोडला गेला आहे, असे अभ्यासात म्हटले आहे.
*उच्च रक्तदाब आहे हृदयविकारासंबधी मुख्य धोकादायक घटक…
उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक या विकारांसाठी एक मुख्य धोकादायक घटक आहे आणि जागतिक स्तरावर अकाली मृत्यूचे मुख्य कारण ठरू शकते.”लोक किती मिनिटे मोबाइलवर बोलण्यात घालवतात याचा हृदयाच्या आरोग्यासाठी जास्त धोका असतो. जास्त मिनिटे म्हणजे जास्त धोका” असे चीनच्या ग्वांगझू येथील सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीचे अभ्यास लेखक शियानहुई किन यांनी सांगितले.
*दीर्घकाळानंतर दिसून येतात दुष्परिणाम…!
प्रो.किन यांनी सांगितले की, वर्षानुवर्षे, हॅण्ड्स-फ्री सेटअप वापरल्याने उच्च रक्तदाब विकसित होण्याच्या शक्यतेवर कोणताही परिणाम झाला नाही, पण आता परिस्थिती बदलत असल्याचे दिसते. काही लोकांमध्ये त्याचे दुष्परिणाम चटकन ओळखले जाऊ शकतात, परंतु काही लोकांमध्ये ते शांतपणे कार्य करतात आणि अचानक एखाद्या आजाराच्या स्वरूपात आपल्यासमोर येऊ शकतात.
*सुमारे सात टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे दिसून आली…
युरोपियन हार्ट जर्नल डिजिटल हेल्थ मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासादरम्यान, यूके बायोबँकच्या डेटाचा वापर करून फोन कॉलवर बोलणे आणि उच्च रक्तदाब यांच्यातील संबंध तपासण्यासाठी ३७ ते ७३ वयोगटातील एकूण २१२,०४६ प्रौढांचा समावेश करण्यात आला होता.
अभ्यासाच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, १२ वर्षांपर्यंत आठवड्यातून एकदा किंवा अनेक वेळा अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ फोनवर बोलणाऱ्या १३९,८४ (सुमारे सात टक्के) लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळली. इतकेच नाही तर याच अभ्यासात एक गट असाही होता इतका जास्त वेळ फोनवर बोलत नव्हता. जेव्हा संशोधकांनी या दोन गटांची तुलना केली तेव्हा त्यांना असे आढळून आले की, फोनवर बराच वेळ बोलणाऱ्यांमध्ये उच्च रक्तदाबाचा धोका अनेक पटींनी जास्त आहे.
-कुमार चोप्रा
-डॉ. सुनील इनामदार
9823034434.*

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *