• Wed. Jun 7th, 2023

म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद करत नाहीत..!

तुम्हालाहा हा प्रश्न पडला असेल कि रेल्वेचे इंजिन का बंद करत नाहीत, कारण त्यावर मोठ्या प्रमाणात डिझेल खर्च होते. तरीही रेल्वे इंजिन बंद करण्यात का येत नसेल? तुम्ही कोणत्याही रेल्वे स्थानकावर जा तिथे कितीही वेळ रेल्वे थांबली तरी त्या रेल्वेचे इंजिन कधीच बंद करण्यात येत नाही. जर काही तांत्रिक बिघाड झाला तरच रेल्वेचे इंजिन बंद करण्यात येते, तर यामागे डिझेलचे इंजिन ही खरी समस्या आहे.
डिझेल इंजिन बंद केल्यास लोको पायलट आणि प्रवाशांना मोठा त्रास होऊ शकतो. डिझेल इंजिनची तांत्रिक बाजू किचकट असते. यामुळे लोको पायलट ते बंद करण्याऐवजी ते सुरुच ठेवतात. त्यामुळे पुन्हा डिझेल इंजिन सुरु करण्याच्या कटकटीतून वाचता येते. ज्यावेळी रेल्वे स्टेशनवर थांबते, त्यावेळी रेल्वेचा इंजिन ब्रेक दबाव सहन करु शकत नाही, दबाव तयार करण्यासाठी रेल्वेला मोठा वेळ लागतो. ट्रेन थांबल्यानंतर शिटीसारखा एक आवाज येतो. हा रेल्वेवरील वाढलेला दबाव कमी करण्याचा इशारा आहे. जर लोको पायलटने इंजिन बंद केले तर दबाव तयार करण्यासाठी मोठा वेळ लागेल.
इंजिन बंद करुन केवळ स्टार्ट करण्यासाठी २५ मिनिट लागतात. त्यामुळेच इंजिन बंद करत नाही. रेल्वे इंजिन बंद केल्यास लोकोमोटिव्ह इंजिन बिघडण्याची शक्यता असते. डिझेल इंजिनला एक बॅटरी असते. ती चार्ज झाली तर इंजिन चालू राहते आणि इंजिन चालू राहिले तर बॅटरी चार्ज होते. सातत्याने रेल्वे इंजिन बंद केल्यास त्याचा परिणाम बॅटरीवर होतो. इकडे इंजिनावरही मोठा परिणाम होतो आणि इंजिन बसते. म्हणून कधीच रेल्वेचे इंजिन बंद का करत नाहीत.
संकलन : प्रविण सरवदे,
कराड

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *