• Tue. Jun 6th, 2023

सार्वजनिक स्वच्छतागृह आणि आपली जबाबदारी.!

अनेक ठिकाणी स्वच्छतागृह आणि स्वच्छता यांचा प्रश्न ऐरणीवर असताना या विषयावर लिहिण्याचा विचार काही ठिकाणी गेल्यावर लक्षात आला…अनेक सार्वजनिक ठिकाणे पाहता स्वच्छता, साफसफाई बाबतीत बदनाम आहे.की कर्मचारी साफसफाई करत नाहीत. परंतु किती प्रमाणात आपण त्यांना दोषी ठरविणार… परवाच एका सार्वजनिक ठिकाणी वॉशरूममध्ये किळसवाना प्रकार, घाण, कचरा पाहवयास मिळाले. सुशिक्षित आपणास समजून ही तरुण पिढी कसे वागतात.
खेड्याचे येडे म्हणणे सोपे पण ही शहरातील डिजिटल पिढी पाहता कोणाला शिक्षित म्हणावे… टॉयलेट आणि बाथरूममध्ये पडलेले घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन बापरे काय सांगावे? घरी असे करतो का आपण? आपले पॅड्स घरात कुठेही फेकतो का खरं तर ही गोष्ट महिला असो की मुली त्यांना सांगायची गरज नाहीच तरी आज या विषयावर लिहावेसे वाटले..
प्रत्येक अर्थात बस स्टॅन्ड, बागबगीचे, शॉपिंग मॉल्स,दवाखाने चित्रपटगृहे, शाळा, महाविद्यालये,सर्व सरकारी कार्यालये अशा अनेक ठिकाणी प्रत्येकी कचऱ्यासाठी डसबीन ठेवलेले असते एक साधी गोष्ट जी वस्तू आपण वापरतो त्याची दुसऱ्यांनी का विल्हेवाट लावावी? तोंड वरती करून बोलायला मोकळे होतो आपण शिईईईईईईई किती घाण आहे इकडे?
अहो कोणी केली तो तर विचार करा.. पुरुष मंडळी अशी काही हरकत मुळीच करणार नाही ,मग आपणच त्याला कारणीभूत ना? महिलांनो आणि सुज्ञ मुलींनो स्वच्छता कर्मचारी अगदी तुटपुंज्या मानधनात काम करतात तिही आपल्यासारखी माणसे आहेत…त्यांना आपण कमी लेखून काय काय करण्यास भाग पाडतो हेही पाहायला हवे. अनेक ठिकाणी पुरुष कर्मचारीही ही कामे करतात.अनेक वयस्कर महिला,आणि इतर देखील वॉशरूममध्ये गेल्यावर पाणी टाकण्याचे कष्ट घेत नाहीत किती हा बेजबाबदारपणा…मी तर असे काही पाहिल्यावर पाराच चढतो आणि बोलल्याशिवाय गप्प बसवत नाहीच ..
बऱ्याच महिला टॉयलेटसमोर बाहेर बसून खुशाल निघून जातात असं वाटते कान चांगले सोलावे येणाऱ्या जाणाऱ्यांनी कसे त्या जागेवरून जावे खूप किळस वाटते..ज्याप्रमाणे आपल्याला हक्काची जाणीव असते त्यावेळी कर्तव्य निभावणे देखील तेवढेच महत्वाचे असते स्वच्छता कर्मचारी यांना बदनाम करण्यापेक्षा आपण काय करायला हवे याची जाणीव थोडी ठेवा म्हणजे स्वच्छ आणि सुंदर भारत दिसण्यास वेळ लागणार नाही. जोपर्यत सार्वजनिक ठिकाणी आपण नियम धाब्यावर बसवून मनमानी करतो मग कसं चांगलं होण्याची अपेक्षा धरावी ..मानसिकता बदलणे आवश्यक आहे. काही लोकं म्हणतात तुम्हाला पगार त्याचाच मिळतो म्हणजे तुम्ही घाण करून जावी आणि साफ त्यांनी करावी हा कोणता नवीन नियम शिकविता मंडळी सुधरा जरा …
स्रियांना होणाऱ्या आजारांची कमी नाही ते का होतात कसे होतात त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी हे आपण सोशल मिडियाच्या माध्यमातून वाचत आहोत.. तरी देखील चुका करत आहोत… शाळा , कॉलेज आणि इतर सर्व ठिकाणी यासाठी प्रबोधन होणे गरजेचे आहे.. जसे कीं पॅड कोणते नी कसे वापरावे हे सांगतो त्याचबरोबर ते बंद रॅपर्समध्ये डसबीनमध्ये टाकावे हे सांगण्यास विसरू नये.
सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेमुळे इन्फेकशन होत असतात… रोगराई डास,मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढतो.. आणि दोष मात्र आपण प्रशासनाला देतो.आणि लहान बालकांना देखील बालपणापासूनच स्वच्छतेचे नियम घरी समजून सांगितले तर ते देखील नियमांचे पालन इतर ठिकाणी निश्चित करतील.
स्वच्छता कर्मचारी दिवस उगविण्यापूर्वीच साफसफाईला सुरुवात करतात आणि रस्त्यावर, गाडीत जाणारी लोकं, बिस्कीट, चॉकलेट, व्हेपर्स, कुरकुरे खाऊन कचरा रस्त्यावर फेकतात.. सकाळी सुंदर झाडलेले रस्ते संध्याकाळपर्यंत कचरापट्टी होवून बसतात. हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या दोन बाजू हे विसरता कामा नये.. बाकी आपण सर्व सुज्ञ आहातच. भयानक कोरोनाकाळ सर्वांनी अनुभवलेला आहे साथीचे नवनवीन रोग आपण करत असलेल्या चुकांमुळे येवून ठाकत आहे… तरी आपण सर्वांनी मिळून काळजी घेणे काळाची गरज आहे….
-दिलशाद यासीन सय्यद,
अकोले, अहमदनगर
9850923961

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *