• Wed. Sep 20th, 2023

प्रथितयश लेखिका मा डॉ. सुनीता चव्हाण

नुकताच फेसबुक चाळत असताना बोरिवली येथील प्रथितयश लेखिका मा डॉ. सुनीता चव्हाण यांचा एका दगडावर बसलेला फोटो दिसला आणि त्या फोटोचे निरिक्षण केले असता त्यावर दोन ओळी लिहाव्यात असे मनात आले.
बरं या फोटोवर दोन ओळी लिहाव्यात तर या फोटोत असं काय आहे ? होय तर या फोटोत मानवी जीवनातील काही बाबींचा संदर्भ मला जाणवला आहे. आपण सहज कधीतरी असे फोटो काढत असतो, त्यामागे आपला उद्देश एकच असतो की, तो फोटो एक आठवण रहावी. त्या स्थळाची, घटनेची म्हणून आपण फोटो काढत असतो.
असाच हा डॉ. सुनीता चव्हाण यांनी काढलेला फोटो. कोणते स्थळ आहे माहिती नाही , फोटो का काढला माहिती नाही, फोटोबद्दल त्यांच्याशी बोलणे नाही, फक्त या फोटोवर दोन ओळी लिहू का , बसं इतकंच व्हाटस् ऍपवर लिहून त्यांची परवानगी घेतली.
तर या फोटोत आपल्याला दिसत आहे की सूनीताताई कुठेतरी ऐतिहासिक स्थळी बसलेल्या आहेत, पाठीमागे झाडी आहे. त्या जिथे बसल्या आहेत तेथे काळ्या कातळाची बैठक आहे त्या बैठकीवर पाय पसरून, हात मांडीवर ठेवून त्या हलकंसं स्मित हास्य करीत आहेत, डोळ्यांवर नंबरचा चष्मा आहे… बसं असं प्रथमदर्शनी दिसतं.. पण त्या इथेच का बसल्या, पाय पसरूनच का बसल्या, दगडावर बसल्या यांचा अर्थ काय.. मी माझ्या तर्क- कल्पक वृत्तीने हा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
निसर्गाने मानवाला खूप काही दिले, आपणही या निसर्गाचा एक भाग आहोत, या निसर्गाच्या सान्निध्यात गेल्याने आपल्याला आपली किंमत कळते. निसर्ग आपल्याला जे देतो ते निरपेक्ष असते, कोणताही स्वार्थ नसतो, निसर्गातील पशुपक्षी, वृक्षवेली,‌ हवा हे सर्व आपल्याला निसर्ग मोफत देत असतो म्हणून आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो पाहिजे, निसर्गाशी संवाद साधला पाहिजे. निसर्गाकडून देण्याची दानत असावी हा संदेश घेतला पाहिजे. मानसाने निसर्गासारखे देण्याची दानत ठेवली पाहिजे, काही लोकांना फक्त लूबाडण्याची दानत असते, फुकट काय मिळते यावर जास्त डोळा असतो.. तुमचे कर्म चांगले असेल तर तुम्हाला निसर्ग जरूर देईल. “देण्याची दानत” माणसाने बाळगावी हा मौल्यवान संदेश कदाचित सूनीताताई या निसर्गाच्या सान्निध्यात येवून देत असाव्यात असं मला वाटतं.
सुनीताताई अशा पाय पसरूनच का बसल्या… तर माझा तर्क असा आहे की, त्या ईथे आल्या तेव्हा एक दोन ठिकाण बसण्यासाठी बघीतली असावी, पण तेथून पाठीमागचा निसर्ग फोटोत व्यवस्थित दिसत नसावा , मग फोटो उभा छान दिसेल की बसून छान दिसेल हा ही विचार मनात आला असावा , एक दोन फोटो उभे राहून घेतले आणि मग फोटो काढणारे सोबत असतील त्यांच्यासोबत चर्चा करून असे पाय पसरून बसावे असे ठरले असावे आणि मग या पोजवर कायम राहून हा फोटो घेतला गेला असावा. हा एकमेकांत झालेला समझोता हेच दर्शवितो की, आपण इतरांच्या विचारांचे, निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. दुस-याच्याही मतांचा आदर केला पाहिजे असा तर्क मला इथं जाणवला.
त्या ज्या दगडावर बसलेल्या आहेत, तो दगड निश्चल आहे, अबोल आहे, पण त्याला एक संवेदना आहे, मन आहे त्या संवेदना, ते मन ज्याच्या सहवासात जाईल तसे असते. सूनीताताई यांनी या दगडाकडून काही अर्थ जाणून घेतले आहेत ते असे की, मानसाने दगडासारखे विचार ठाम असावे. “मी माझ्या विचारांशी ठाम आहे, तुम्ही माझ्याकडे कोणत्या अर्थाने पाहता याची मला फिकीर नाही पण मी माझ्या विचारांशी, निर्णयाशी तडजोड करत नाही, माझा ठाम विश्वास माझ्या मनावर आहे”. असा ठामपणाचा संदेश या दगडाकडून मानसाने शिकावा हेच यातून मला अभिप्रेत होते आणि दगडाकडून हाच संदेश घ्यावा.
सुनीताताई पाय पसरून बसलेल्या आहेत आणि स्मित हास्य करीत आहेत याचा अर्थ मानवी जीवनाशी जोडलेला आहे. माणूस कष्ट करतो, कष्टमय जीवन जगत असताना माणसानं नेहमी हसतमुख रहावे. काही कष्टकरी संपत्ती कमावतात आणि ते आपल्या विश्वात रमून जातात. मात्र काही इतकी संपत्ती कमावतात की त्यांना आभाळ ठेंगणे वाटते, मग ते नेहमी हवेत उडण्याच्या भाषा करतात , पण एक लक्षात ठेवले पाहिजे की, आपण कितीही मोठे झालो तरी आपण समाजात निट वागले पाहिजे आपण या समाजाचे देणं लागतो, आपल्याला या समाजाने मोठं केलं आहे , आपण हवेत न उडता आपले पाय जमिनीला असावे.
ज्या समाजाने आपल्याला मोठं केलं त्या समाजाला सोबत घेऊन चालले पाहिजे. अशा उडणा-या लोकांना एक संदेश म्हणून सुनीताताईंचा हा बोलका संदेश इथं मला भावला की , “माणसानं कितीही मोठं झालं तरी आपले पाय जमिनीला असाव” आणि आपल्या चेह-यावर नेहमी प्रसन्नता असावी हा संदेश तर देत नाही? तसेच त्यांनी नंबरचा चष्मा वापरला आहे यातून असा अर्थ निघतो की, माणसानं चौकस रहावं… विशेषतः महिलांनी समाजात वावरताना जागृत रहावं, आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीचे चौकस बुद्धीने निरीक्षण करावं.
आपली नजर नेहमी चांगल्या गोष्टींच्या शोधात असावी. घार जसे आभाळात उंच राहूनही खाली घरट्याकडे लक्ष असते ईतकं बारीक बघता आलं पाहिजे हा संदेश यातून दिलाय असं मला वाटतं. तसेच त्या ज्या जागेवर बसल्या आहेत ती जागा त्यांनीं निवडली आहे, माझ्या निर्णयाने मी ईथं बसली आहे. (लाक्षणिक अर्थाने मी आज जे काही आहे ते स्वकर्तुत्वाने आहे)
ईथं स्त्रीची खंबीर भूमिका मला जाणवली. स्रीने तिला स्वत:ला दृढनिश्चयी, खंबीर केले पाहिजे आणि आपली जागा , आपलं स्थान स्वतः निवडलं पाहिजे हा गर्भितार्थ मला इथं जाणवला.
या फोटोकडे बघून मला जे तर्क कल्पनाशक्तीने जाणवलं ते लिहलंय, यातील सत्य असत्य पडताळणीवर अवलंबून आहे. मात्र हा फोटो खूप काही अर्थ सांगतो आहे. काही संदर्भ अनावधानाने चुकीचे आले असतील तर क्षमस्व..!
धन्यवाद
-प्रशांत वाघ (पॅसिफिक टायगर)
संपर्क – तीन सत्ते एकोणचाळीस पंचवीस हजार

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,