• Sun. May 28th, 2023

आई : सृष्टीनिर्माती?

हा निसर्ग. हा निसर्ग रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक व्यक्ती वा सर्व प्रकारचे निसर्गातील जीवजंतू जन्म घेत असतात. तसा सर्वांना जन्म घेण्याचा अधिकार आहेच. जर या निसर्गात अशा जीवजंतूचा जन्म झाला नसता तर या निसर्गात दुस-या भाषेत सांगायचं झाल्यास जीवसृष्टी राहिली नसती.
निसर्ग हा रमणीय आहे. या निसर्गात प्रत्येक सजीव जसा जन्म घेतो, तसाच तो मरतोदेखील आणि जेव्हा तो जन्म घेतो, तेव्हा अविरत आनंद असतो आणि जेव्हा मरतो, तेव्हा साहजीकच दुःख होतं. या दुःख प्रसंगी काही जीवजंतू शोक व्यक्त करतात तर काही तसा शोक व्यक्त करीत नाही. तसंच ज्यावेळेस प्रत्येक जीवजंतूचा जन्म होतो, त्याचवेळेस त्याचं मरणही ठरलेलं असतं. मग कितीही औषधोपचार केला तरी.
जन्म……..प्रत्येक जीवाच्या जन्माचा कालावधी हा ठरलेला आहे. काही काही प्राणी आपल्या आईच्या गर्भात एका सेकंदापेक्षा कमी काय राहतात तर काही प्राणी अनेक वर्षपर्यंत राहतात. तसंच प्रत्येक जीवाच्या जन्म होण्याचा कालावधीची हा कमीजास्त आहे. जसा वाघीण बारा वर्षापर्यंत गरोदर राहात नाही.
 गरोदरपणाचा काळ……..प्रत्येक जीवाला जन्म घेत असतांना त्याची पुरेशी वाढ होण्यासाठी पुरेसा काळ लागतो, यालाच गरोदरपणाचा काळ असं संबोधन आहे. हा काळ प्रत्येक मातेसाठी अतिशय वेदनादायी असतो. या काळात बाळ आईच्या गर्भात असतांना स्वस्थ बसून राहात नाही. कधी निपचीत पहुडतो तर कधी तिला पाय मारतो. त्यानुसार त्या मातेची पोटदुःखी ठरलेली असते. बाळानं हालचाल केलीच नाही तर तिलाच काळजी वाटते व ती विचार करते की बाळाला काही झालं तर नाही. महत्वपुर्ण गोष्ट ही की आईच्या गर्भात प्रत्येक जीव हा स्वस्थ बसत नाही. तो सतत तिला त्रास देत असतो.
 बाळाचा जन्म होतो. तसा सगळीकडं आनंदीआनंद पसरतो. परंतू त्या बाळाला जन्म देतांना ज्या आईनं त्रास भोगला, ते दुखणंखुपणं कोणीही पाहात नाही. हा जन्म देणं म्हणजेच त्या आईचा नवीन जन्मच असतो. या प्रक्रियेत काही काही प्राण्यांचा मृत्यूही होतो. जसे. विंचवाला जन्म देणारी माता आपल्या पिल्लाला जन्म दिल्यानंतर आपल्याच पिल्लाची भक्ष बनते. मधमाशीही प्रजनन करीत असतांना उडता उडताच थकल्यानं मरण पावते. असे अनेक प्राणी आहेत. म्हणजे त्या मादीला माहीत असते की मी जर गरोदर राहिले की मला मरावंच लागेल. तरीही धोका स्विकारुन त्या गरोदरपण स्विकारतात. कोणासाठी तर आपल्या लेकरांसाठी. काही काही प्राणी हे प्रसूतीकाळातच प्रसूती व्यवस्थीत न झाल्यानं मरण पावतात. बाळ मात्र जीवंत राहातं.
काही काही प्राणी मात्र याला अपवाद आहेत. असे प्राणी हे आपल्या पिल्लांना जन्म जन्म दिल्यावर आपल्याच मुलांना खात असते. यात साप, उंदीर आणि कुत्र्याचाही समावेश आहे. म्हणतात की साप जेव्हा आपल्या पिल्लाला जन्म देते. तेव्हा ती आपल्याच बाळाला भूक लागल्यानं खात असते. तशीच कुत्री आणि उंदरंही तेच करीत असतात. म्हणतात की उंदरं तर त्याला भूक लागली आणि खायला काही न मिळाल्यास आपलेच अवयव खात असतात.
विशेष म्हणजे बाळ जन्म घेतांना आईला फार त्रास देतो गर्भात असतांना आणि तो जेव्हा गर्भातून बाहेर येतो, तेव्हाही आईला भयंकर त्रासच होत असतो. आईला मुल गर्भात असतांनाचा त्रास. या काळात अक्षरशः जेवन होत नाही. ओका-या होत असतात. त्यानंतर जन्म होताच त्रास. या काळात अत्यंत वेदना होत असतात. काही स्रिया मरतात वेळीच बाळाचा जन्म झाला नाही तर……..काहींचं सिझर होतं, त्याचा सहा महिने त्रास. तसं पाहता ते मूल मोठं करीत असतांनाही त्रास सहन करावा लागतो मातेला. एवढा त्रास सहन करते आई. बदल्यात काय मिळतं. ते वृद्धाश्रमातील चटके आणि तो म्हातारपणातील क्लेश. बाळ आपल्या आईला जन्मापुर्वी गर्भातही त्रास देत असतो आणि जन्म झाल्यावरही. आपल्याला बाळास असा जन्म देतांना मरण येणार आहे. हे माहीत असूनही. तरीही ती जन्म देत असते धोका पत्करून. जणू आपल्या लेकरासाठी नाही तर सृष्टीला तेवत ठेवण्यासाठीच. महत्वपुर्ण गोष्ट अशी की आपण मरण पावलो तरी चालेल, सृष्टी मरण पावायला नको. यासाठीच आपली आई त्रास सहन करुन प्रसंगी धोका पत्करून आपल्या बाळाला जन्म देत असते. त्यातच ती प्रसंगी मरणही पावते. तिला माहीत असतं की ती मरु शकते, तरीही ती बाळाला जन्म देत असते.
महत्वपुर्ण गोष्ट ही की आपली आई आपल्यासाठी एवढा त्रास सहन करीत असते. तेव्हा आपलंही कर्तव्य बनतं की आपण तिचं देणं लागतो. आपण तिचं ऋणपण लक्षात घेवून आपण तिच्या म्हातारपणात तिची सेवा करावी. तिलाही आधार द्यावा. तिला वृद्धाश्रमात पाठवू नये. परंतू आपण तिची सेवा करीत नाहीत. आपण जन्मापुर्वी तर तिला त्रास देतोच. व्यतिरीक्त तिला जन्म झाल्यानंतरही. तसंच तिला म्हातारपणातही अतिशय त्रास देत असतो. तिला वृद्धाश्रमातही पाठवीत असतो. जे की आपण करायला नको.
 महत्वाचं म्हणजे आई ही आपली आई असते. सृष्टी जतन करुन ठेवणारी. ती मग कोणाचीही आई असो. जीवजंतूची का असेना, ती कोणालाही जन्म देतांना आपल्या मरणयातनेचा विचार करीत नाही आणि जन्म देते. तीच बाब आपण विचारात घेवून आपणही तिच्या तरुणपणी नाही तर तिच्या म्हातारपणी, जेव्हा तिला आपल्या आधाराची गरज असते. तेव्हा आपण आपली माणूसकी शाबूत ठेवून प्रत्येकाच्या आईला मरणापर्यंत सांभाळावे. तिला त्रास देवू नये. मग ती जीवजंतूची आई का असेना, जीवजंतूलाही मारु नये. त्यांच्यामध्ये कोणाची आई लपलेली असते. कारण प्रत्येक जीव हा सृष्टी प्रवर्तक असतो. सृष्टीरक्षकही असतो आणि सृष्टीवर्धकही. ती जर नसेल तर प्रत्यक्ष सृष्टीविधात्याच्या कार्यात अडचण येईल. त्यांचे कार्य थांबेल. त्यातच तो कधीच आपल्याला माफ करणार नाही. हे लक्षात ठेवावे.
-अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *