• Mon. Jun 5th, 2023

मक्तेदारी…..!

मक्तेदारी…..!
क्षेत्र कुठलं ही असू द्या ! अगोदर पासून ठाण मांडुन बसलेले मातब्बर आणि त्या क्षेत्रातील गब्बर व्यक्ती असतात. काही ही झालं तरी लगाम आपल्याच हातात हवा ही त्यांची मानसिकता असते. बाहेर बोलताना फक्त
बोलायचं ह्या क्षेत्रामध्ये नवीन होतकरू तरुणांच स्वागत आहे. अगदी कुठली ही मदत करायला आम्ही तयार आहोत परंतु मुह में राम और बगल में….अशी त्यांची मानसिकता असते….
 मग याला चित्रपट क्षेत्र तरी कसं अपवाद असेल उलट इथं आणि राजकारणात सर्वात जास्त घराणेशाही दिसून येते हे सांगण्याची गरज नाही. शोधली तर किती तरी उदा. आपल्याला सापडतील. त्यामुळे ह्या लोकांची
मानसिकता कमालीची कोती झाली असून जर दुसरा कुणी ह्या क्षेत्रात येतोय , आणि यशस्वी होतोय हे ह्यांच्या पचनी पडण खूप अवघड आहे. नागराज मंजुळे यांचं कधी तोंडभरून कौतुक केलेलं तुम्ही पाहिल का ?कारण त्याने यांची सगळी रेकॉर्ड तर उध्वस्त केलीच परंतु यश यांच्या अगदी छाताडावर बसून खेचून आणलं. मग काय तिथे ही कलाकृती सोडून जातीच विष पेरून तो कसा वाईट आहे कसा जातीवादी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला जर तो जातीय वादी वाटतो तर तुम्ही ही काही तरी सरस निर्मिती करून दाखवा.पण तस नाही
त्याच यश पचनी पडत नाही….!
खर तर त्या वेळी पासून जो झटका लागला त्यातून सावरतो न सावरतो तोच ग्रामीण भागातून आणखी नवीन गुणवत्ता असणारी पोर ,वेगवेगळे विषय शिवाय वास्तव दर्शी मांडणी करून जनते समोर सत्य
सिनेमाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणू लागले. शिवाय देखणा हिरो ही संकल्पना बाजूला सारत, ग्रामीन भागातील रांगडा हिरो पडदयावर, दिसू लागला लोक ही त्याला स्वीकारू लागले. इथे मात्र प्रस्थापित सिनेमाश्याही चा जळफळाट झाला. हे TDM सिनेमा बाबत दिसून आलं आहे.
ह्या सगळ्या वरून फक्त एक गोष्ट लक्षात येते ग्रामीण भागातील तरुणांनी आग लावली असून त्यांच्या झळा ,पुण्या ,मुंबईत ,बसत आहे. मक्तेदारी ,च्या नावा खाली चालणारी दुकानदारी बंद होईल म्हणून हा नेभळट मार्ग निवडला जरी असला तरी ग्रामीण जनता गनिमी कावा जाणते आणि मानते ही , इथं ही काही तरी आमचा तरुण जुगाड करून , तुमचा कोते पणा उघडा ,नागडा करणार आहेत फक्त वेळ द्या …
शेवटी फक्त एवढंच लिहतो ,बनवा र पोराहो…सिनेमे
उद्याचा काळ आपलाच हाय…! घाबरायचं नाय….!
अशोक पवार
8369117148

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *