नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार शेतकऱ्यांच्या बांधावर !
* अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे वरूड मोर्शी तालुक्यातील शेतकरी हवालदील !
* महसूल व कृषी कृषी विभागाला दिले पंचनामे करण्याचे निर्देश !
वरूड (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी वरूड तालुक्यात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी पाहणी केली.
वरूड तालुक्यातील टेंबूरखेडा, भेमंडी, झटामझिरी, गव्हाणकुण्ड, बहादा, इसंबरी परिसरातल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी आमदार देवेंद्र भुयार यांनी संवाद साधला. तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी महसूल व कृषी विभागाला दिले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की मागील आठ दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे संत्रा, मोसंबी, कांदा, गहू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई कशी देता येईल याबाबत शासन सहानुभूतीने विचार करेल. पंचनाम्यांअभावी कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता कृषी विभाग व महसूल विभागाने घ्यावी, असेही निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघात मोर्शी वरुड तालुक्यातील मौजा – टेंबूरखेडा, भेमंडी, झटामझिरी, गव्हाणकुण्ड, बहादा, इसंबरी परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस,गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची शेतबांधावर जावून प्रशासकीय अधिकारी यांच्यासह पाहणी केली.
तसेच मोर्शी वरुड मतदार संघात झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई करिता महसुल विभाग आणि कृषि विभाग यांना नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई अहवाल तात्काळ सादर करण्या बाबत निर्देश देवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत राज्यशासनाकडे पाठपुरावा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळऊन देणार असल्याचे आमदार देवेंद्र भुयार यांनी सांगितले.