महाराष्ट्र देशाची शान
अवघ्या भारतात मान
अवघ्या भारतात मान
संस्कृतीचा जपला ठेवा
लोककलेची रे समृद्धी
प्रबोधनाची असे परंपरा
अन शूरवीरांची खाण
Contents hide
कर्मवीर अन धर्मवीर
मातीत बहु या झाले
वारकरी अन टाळकरी
इथे दोहोंचा सन्मान
उद्योगात केली क्रांती
देशात अव्वल स्थान
श्रमाची महती येथे
अन् कामगारांचा मान
झाले बहु होतील बहु
परंतु ह्या सम हाच
संकटाला धावुनी जातो
इथला थोर-लहान
चांद्यापासून बांद्यापर्यंत
घेई प्रगतीचा ध्यास
समतेचा संदेश देतसे
राज्य अमुचे महान
*महाराष्ट्र व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
–आबासाहेब कडू
अमरावती
(९५११८४५८३७)
(१ मे २०२३)
(९५११८४५८३७)
(१ मे २०२३)
छान कविता आबासाहेब