• Mon. Jun 5th, 2023

मी अनुभवलेला माणसातील देवमाणूस : डॉ. सुजय पाटील

अकोला शहर असो की जिल्ह्यातील परिसर असो वा तमाम महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या सर्वांचे परिचित असलेलं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. सुजय पाटिल सर आहेत… अकोला मध्ये स्थित पाटील हॉस्पिटल नसून त्याला त्यांनी एक मंदिरच बनवलं आहे, जस की, मंदिरात प्रत्येक भक्त आशेने विश्वासाने जातो व खाली हात कधीच येत नाही अगदी त्याचप्रमाणे…शहरी असो वा ग्रामीण भाग, मध्यमवर्गीय, गोरगरीब, शेतकरी अथवा शेतमजूर वर्ग यांचे मसीहाच जणू डॉ.सुजय पाटील साहेब आहेत…
उच्च शिक्षण घेऊन डॉक्टरकी क्षेत्रात उच्च पदवी ग्रहण केली पण इतर डॉक्टर्सच्या तुलनेत आपल्याकडे नाही. निव्वळ नाही सारखी अशी फी यांनी ठेवली हे आश्र्चर्यचकित करून सोडणार वास्तव आहे…अतिशय माफक नाममात्र दरात अत्यन्त कमी शुल्क, अत्यन्त कमी औषध खर्च…व आपुलकी अशी की माया, प्रेम माणुसकीची परिभाषाच तिथून जन्म घेते….मी अनुभलेले माणसातील देव माणूस डॉ. सुजय पाटील आहेत….
महागाई आणि बिकट अशा काळात आपल्या कर्तृत्वाने व एकनिष्ठेने पालन करून सामाजिक दायित्व डॉ. साहेबांनी प्राणपणाला लावून जोपासलेलं आहे. त्यांच्याबद्दल खरंच अभिमान व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्दरूपी अनेक शब्द आहे. म्हणून असंख्य शब्द त्यांच्या या प्रयत्नाला आपण संबोधित करू शकतो. ध्येयवान, कीर्तिवान, सामर्थ्यवान, कर्तव्यनिष्ठ, कर्तव्यदक्ष, पालनकरता, असंख्य शब्द त्यांच्या या नावाला आपण देऊ शकतो, खरंच त्यांचा गौरव हा प्रत्येकाला आहे….
मनोरुग्ण हे असंयमी असतात. नेहमी त्यांच्यासमवेत बाळगणं त्यांना ट्रीटमेंट देणं हे खूप कठीण व गंभीर कार्य असत…पण साहेबांचं बोलणं, प्रेम, माया ह्यासमोर सर्वच नतमस्तक आहेत…अत्यंत बिकट परिस्थितीत, अत्यंत कठीण प्रतिकूल परिस्थितीतून जेवढ्या असलेल्या साधनांचा उपयोग करून उच्च दर्जाची निव्वळ निशुल्कच आशा स्वरूपात नेहमीपासून त्यांनी निरंतर सेवा प्रदान केली आहे व करत आहेत.आम्ही यांच्या सेवा करण्याच्या देवरूपी माणसाला मनातून मुजरा करतो..
 प्रत्येक पेशंट जवळ जाऊन ममतेचा, मायेचा दयासागर हात फिरवून पेशंटला बळ देत नेहमी पारिवारिक वागणूक मिळते. असंख्य रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती होतात त्यांच्यामध्ये नवऊर्जा, नवचैतन्य, आणि नवी उमेद व एकदम ठीक होऊन नेहमी आनंदी जीवन जगण्याच सूत्र घेऊन जातात..
डॉक्टर साहेबांचे व्यक्तिमत्व शब्द रूपामध्ये न सांगण्यासारखा आहे खरंच एक देवीशक्ती त्यांच्या मनामध्ये सतत संचार करत राहते. डॉ. साहेब श्री. गजानन महाराज यांचे निष्ठावंत भक्त आहेत व रुग्णसेवेत समाज सेवा ते खऱ्या अर्थाने करत आहेत…
आपला परिवार त्यांची जबाबदारी ठेवून रुग्णांना पण आपला परिवार समजून तोच दर्जा तेच प्रेम सेवा देण्याचं खुप कठीण असतं पण सरांनी अतिशय प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. त्यांच्या देवीरुपी सेवेमुळे खरंच आपल्या सर्वांच्या पंखात बळ पेरण्यासारखे आहे.मी वैयक्तिक नेहमी खूप उर्जान्वित होतो. आपल्या डॉ. साहेबापासून मला खूप काही शिकायला मिळालं आहे जीवनात…..
त्यांच्यासोबत समाजातल्या सर्व घटकांशी प्रत्येक माणसासाठी सलोख्याने संबंध प्रस्तापित करणे, प्रत्येकाला सर्व बाबींची पूर्तता करणे प्रत्येक घटकासाठी निःपक्ष धोरण ठेवणे, सर्वच स्तरातील लोकांना उत्साही, आनंदी ठेवणे, समाजहित जोपासणे आणि इतका व्याप सांभाळून सुद्धा स्वतःच्या कुटुंबाला वेळ देऊन त्याची प्रतिष्ठा कायम ठेवणे यात डॉ. सुजय पाटील साहेब आहेत आज मला मोठ्या उत्साहाने अभिमानाने सांगावेसे वाटते की, आज देहरूपी, ज्ञानरूपी, कर्तव्यरुपी, कर्तव्यनिष्ठ, कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, कीर्तिवान अकोला परिसरातील अलौकिक व्यक्तिमत्व असलेले आदरणीय श्री. डॉ. सुजय पाटील सर यांची त्यांच्या कर्तुत्वामुळे चौफेर ख्याती पसरली आहे….
आपणास भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा …!
– डॉ. मनमोहन व्यास,
अडगांव बु.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *