आमदार निलेशजी लंके यांच्या हस्ते विविध विकासकामांच गटेवाडी येथे भूमिपूजन

पारनेर (प्रतिनिधी) : खर तर आमदार निलेशजी लकें यांचं विशेष लक्ष असणार गाव म्हणजे गटेवाडी. अनेक वर्षांपासून आमदार निधी तर सोडा परंतु साधा आमदार ह्या गावाकडे छोटी वाडी असल्या मुळे फिरकत ही नव्हता. त्या गटेवाडी गावा साठी आमदार निलेशजी लकें यांनी दिलेला प्रत्येक शब्द पाळला असून . भरगोस निधी ह्या छोट्या गटेवाडी गावाला दिला आहे. मताच नव्हे तर जनमताच राजकारण मी” करत असून गाव छोट जरी असल, तरी विकासा पासून वंचित राहू नये ही प्रामाणिक इच्छा असल्याचं त्यांनी गटेवाडी गावातील विविध विकास कामाच्या उदघाटन प्रसंगी बोलत असताना आपलं मत व्यक्त केलं .
गटेवाडी च नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांच्यासाठी वरदान असलेला बेलओढा पाझर तलाव त्याच्या दुरूस्ती साठी अंदाजित रक्कम १९.४६लक्ष. दुसर म्हणजे गावतलाव दुरुस्ती साठीअंदाजित रक्कम ७.२६लक्ष. तसेच जांभळी मळा, पवारवस्ती आणि मोडदरा केटी वेअर दुरुस्ती अंदाजित रक्कम ११.८०लक्ष.महादेव मंदिर सभामंडप १०लक्ष .एकूण रक्कम” ४८.५२लक्ष .इतक्या अंदाजित रक्कम असणाऱ्या कामाचे उदघाटन झाले असून ह्या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ मंगल चंद्रकांत गट, सोसायटी व्हा चेअरमन संजय पवार सर.तंटामुक्ती अध्यक्ष गटेवाडी संदीप गट मेजर , ग्रामपंचायत सदस्य श्री किरण गट ,रुपाली गट मा. सरपंच कविता गट. मेजर भिवसेन गट मेजर विठ्ठल डावखर जयवंत गट मा उपसरपंच राजू गट नामदेव गट बाळासाहेब डावखर चेअरमन भगवान गट स्वाती गट अनिता गट बाळासाहेब गट उर्मिला गट राजेंद्र गट बाळासाहेब गट, मारुती गट ,दिलीप गट , सो ,सदस्य श्री अमोल गट दादाभाऊ गट मेजर राजाराम डावखर अजय पवार संदीप पवार गणेश पवार शिक्षक नेते चंद्रकांत गट अशोक गट. ज्ञानदेव गट माजी सैनिक किसन पवार गोरख गट ,अजय गट ,आणि वेळो वेळी प्रत्येक कामाचा पाठपुरावा करणारे गटेवाडी येथील शिक्षक नेते चंद्रकात गट ही उपस्थित होते.
तालुक्यातील अनेक मान्यवर देखील ह्याप्रसंगीं उपस्थित होते भोगडे सर सतीश भालेकर ,कारभारी पोटघन मेजर, भोगाडे सर ,जलसंधारण अधिकारी सोनवणे साहेब, चव्हाण कुरकुंभ साहेब ,आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री अर्जुन भालेकर. तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष बाबासाहेब तरटे ही उपस्थित होते.