• Tue. Jun 6th, 2023

मोर्शी वरूड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ

मोर्शी वरूड येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ !
आमदार देवेंद्र भुयार यांच्याहस्ते आपला दवाखान्याचे उद्घाटन संपन्न
मोर्शी तालुका प्रतिनिधी : मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये मोर्शी व वरूड तालुक्यामध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत विस्तार करण्यात आला.
या योजनेचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘सामान्य माणसांचा विचार करून लोकाभिमुख, लोकोपयोगी निर्णय घेण्यात यावे त्यामध्ये आपला दवाखाना ही संकल्पना महत्वपूर्ण ठरेल,’ असे आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज मोर्शी वरूड तालुक्यांच्या ठिकाणी “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” योजना सुरू करण्यात आली. यातून आता गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे. यात सुमारे ३० चाचण्या मोफत करण्यात येणार आहे. करोनाने आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा धडा दिला आहे. छोट्या छोट्या आजारांवरील उपचारासाठी मोठ्या रुग्णांलयांचा ताण कमी करावा लागेल. या उद्देशाने आणि गरजूंना घराजवळ उपचाराची सुविधा मिळवून देण्याची गरज लक्षात घेऊन या योजनेची सुरवात केली आहे.
आजपासून मोर्शी वरूड तालुक्यामध्ये आपला दवाखाना कार्यरत आहेत. त्याचा लाभ लाखो रुग्णांना होनार आहे. आता या योजनेमुळे ग्रामीण भागात सुलभ आणि परवडणारी आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. आरोग्य विभागांतर्गत ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शासनाने या सेवेच्या विस्ताराची घोषणा केली होती. त्यानंतर काही महिन्यांतच आरोग्य विभागाने त्यावर अंमलबजावणी करीत सामान्य नागरिकांना मोफत आरोग्यसेवेसाठी हे दवाखाने उपलब्ध करून दिले आहे.
 मोर्शी व वरूड येथे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत “”हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात मोफत तपासणी, मोफत उपचार, मोफत औषधोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे यामध्ये प्रामुख्याने फिजिशियन,स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ,नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ,मानसोपचार तज्ञ महालॅब्स(संकलन केंद्र) महाराष्ट्र शासनाची निशुल्क प्रयोगशाळा चाचणी निदान योजना वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहेत असून याचा सर्व नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले त्यावेळी मोर्शी वरूड येथील तालुका आरोग्य अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *