‘बेरा: एक अघोरी’ फेम अमर सातघरे तालुका भूषण पुरस्काराने सन्मानित

‘बेरा: एक अघोरी’ फेम अमर सातघरे तालुका भूषण पुरस्काराने सन्मानित
माझ्या आयुष्यातील सर्वात पहिला आणि मोठा बहुमान- अमर सातघरे
सुनील शिरपुरे/झरीजामणी
झरीजामणी तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त पाटण येथे आयोजित कार्यक्रमात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक तसेच कृषी क्षेत्रात नावलौकिक ‘बेरा: एक अघोरी’ फेम अमर नामदेवराव सातघरे यांना तालुका भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी वणी मतदार संघाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, पाटण येथील सरपंच सौ.प्रशांती कासावार, पत्रकार संघाचे अध्यक्ष निंदेकर, सचिव मा.बंडू सोयाम तसेच सामाजिक कार्यकर्ते रामलू आईटवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी, माझ्या आयुष्यातील हा सर्वात पहिला पुरस्कार असून तो मला माझ्या तालुक्यातील लोकांनी दिला हे मी माझे भाग्य समजतो. हा सत्कार माझ्यासाठी मोठा बहुमान आहे, असे मत अमर नामदेवराव सातघरे यांनी या सत्काराप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी मा आमदार बोदकूरवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी, सदस्य व गावातील नागरिक उपस्थित होते.