• Sat. Sep 23rd, 2023

एक सल……

एक सल……
 खर तर आयुष्यात मिळालेलं टिकल पाहिजे, अथवा टिकवून धरता आलं पाहिजे मग तो पैसा असू देत अथवा माणस.” पैसा हा फकिरी दूर करतो तर माणस मात्र खऱ्या अर्थाने मनाची गरिबी दूर करतात. एक वेळ पैसा खर्च करताना थोडा हात सैल केला तरी चालेल परंतु जोडलेली माणस मात्र जर आपल्या कडून तुटू लागली तर समजून जा विषय गँभीर आहे. उगाच विषय गँभीर तिथं आम्ही खंबीर म्हणून चालत नाही .हे चांगलं लक्ष्यात घ्या.
लक्ष्मी चंचल आहे ती सांभाळून धरली तर टिकते हे आपल्याला आपल्या घरातून बालपणापासून शिकवलं जातं नव्हे आपल्या मनावर बिंबवल जात. त्या मुळे आपन पैसा पाण्याच्या बाबतीत इतके बेफिकीर नसतो जितक माणसांच्या बाबतीत असतो. महिना दोन महिन्यातून आपण बँकेत जाऊन पासबुक एन्ट्री मारून येतोच .सगळं
काही मोबाइल वर समजत असताना ही आपण जातोच ना..! कारण पासबुक इंर्टी करून पाहण्यात जी फिलींग आहो भावना .आहे ना ती खूप वेगळी असते घटका भर त्या बँकेच्या वातानुकूलित दालनात आपण पासबुक वरील आकडे पाहून सुखावतो .
तसच कधी तरी मनात साठलेली अनेक माणसे असतात परंतु आपण मात्र त्यांना आठवण्याचा प्रयत्न करत नाही थोडक्यात काय तर मनाच्या पासबुक वर त्यांच्या आठवणींची एन्ट्री करत नाही.आणि जरी केली तरी आपण मात्र स्वतः होऊन कधी फोन ही करत नाही अथवा भेटायला ही जात नाहीत. जगाचा नियम आहे लेटेस्ट आलं की जून ओल्डस्ट” होऊन जातं. परंतु बदलत्या काळात देखील बँकेच जून खात जस आपण अपडेट करत चालू ठेवतो तशीच ही आपल्याशी जोडली गेलेली खाती ही
अपडेट करून बोलून त्यांच् आपल्या खात्या सोबत संलग्न असणं ही चेक करत जा. खर तर ही खाती खूप गरजेची असतात. ज्या वेळी गरज लागते त्या वेळी तुमच्या खात्यात असणारी रक्कम जे काम करू शकणार नाही ते काम
ही मनात साठलेली माणसांची खाती आपण संलग्न असलो तरी मदत करून जातात …..
काही नाही हो आठवड्यात एकदा फोन करा खर तर तो फोन आपण आणि तो ही असल्याचा संदेश समजून जरी फोन केला ना तरी फिलिंग भारी असते बर का…?आता तो करत नाही मी का करू!मी एकदा केला त्याने केला नाही ही पळवाट नको बर का…..! थेट काळजातून काळजाशी संवाद साधला गेला पाहिजे बर का..!तर आणि तरच मज्जा
हाय नाय तर आयुष्य भली मोठी सज्जा” हाय…
अशोक पवार
8369117148

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,