विभागीय आयुक्त अमरावती यांना प्रकल्पग्रस्तांचे निवेदन
अमरावती : सोमवार दिनांक 17 4 2023रोजी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष कृती समिती यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमरावती यांच्या कार्यालयावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी विराट महामोर्चा काढण्यात आला.महामोर्चाला शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आपल्या विविध मागण्याचे निवेदन मा. विभागीय आयुक्त यांना देण्यात आले व त्यांच्यासोबत समितीच्या प्रतिनिधी मंडळाने सविस्तर चर्चा करण्यात केली. यावेळी विभागीय आयुक्त यांनी मा.मुख्यमंत्री व मा. उपमुख्यमंत्री यांना आपल्या रास्त मागण्याचा अहवाल सादर करून बैठकीबाबत त्यांना विनंती करणार असल्यास सांगितले. समिती शिष्टमंडळामध्ये डॉ.भगवान पंडित, नितीन मलमकार, महादेवराव ठाकरे, प्रमोद खाडे, दिगंबर महल्ले व विश्वनाथ शिंदे या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.