अक्षय तृतीयेच्या महापर्वावर परशुराम जयंती

अक्षयतृतीया हा पर्व भगवान परशुराम जयंतीच्या निमित्यानं मानला जातो. अशी आख्यायिका आहे की या दिवशी पित्तरसुद्धा स्वर्गातून वा नरकातून पृथ्वीवर येतात. त्यामुळं या दिवशी त्या पित्तरांच्या पुजेच्या रुपानं त्यांची पुजा केल्यास ती त्या पितरांपर्यंत पोहोचते असं मानलं जातं.
भगवान परशुराम…….त्यांना हिंदू धर्म ग्रंथानुसार भगवानाचा दर्जा दिलेला आहे. तसंच त्याला विष्णूचा अवतार मानल्या गेलं आहे. त्याचं मुळ नाव राम होतं. परंतू एका प्रसंगी भगवान शिवानं त्यांना परशू दिल्यानं त्यांचं नाव परशूराम ठेवण्यात आलं. तो प्रसंग होता तपश्चर्येचा. म्हणतात की पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात क्षत्रीयांचा अन्याय अत्याचार माजला होता. त्यामुळं भगवान परशुराम यांनी शिवाची आराधना केली. कारण त्यांना संपुर्ण पृथ्वीला निःक्षत्रीय करायचे होते. त्याच रुपानं भगवान शिवानं प्रसन्न होवून पृथ्वी निःक्षत्रीय करण्यासाठीच परशू प्रदान केले.
 परशुराम हे एका ब्राह्मण ऋषीच्या घरी जन्मले. त्यांना विष्णूचा सहावा अवतार संबोधतात. महर्षी भृगूचा नातू जमदग्नी यांचेवर देवराज इंद्र प्रसन्न होवून त्यानं वरदान स्वरुप जमदग्नीनं पुत्रकामेष्टी यज्ञ करताच हा मुलगा दिला असं मानलं जातं.
भगवान परशुरामाचे प्राथमिक शिक्षण विश्वामित्र कडून झाले. त्याचबरोबर त्यांना ऋचीक व कश्यपाकडून वैष्णव मंत्र प्राप्त झाले. त्याच ज्ञानाचा वापर करुन त्यानं कर्ण, भिष्म, द्रोण यांना विद्या दिली. त्यानंतर कर्णाला शाप सुद्धा दिला की त्याची विद्या ऐनवेळेस त्याच्या कामात येणार नाही. त्यांनी नारी जागृती अभियानाचं संचलन केलं. त्यांनी पृथ्वीला एकवीस वेळेस निःक्षत्रीय केली.
त्यांनी वैदिक संस्कृतीच्या प्रसाराचं कार्य केलं. मानलं जातं की गावाची सुरुवात त्यांनीच केलेली असून अधिकतर गाव त्यांनीच वसवले आहेत. तसंच असंही मानलं जातं की त्यांनी गावं वसविण्यासाठी गुजरातमध्ये समुद्रतटावर बाण मारुन त्या समुद्राला केरळपर्यंत ढकलून तिथं भुमी निर्माण केली. त्यांनी आपल्या मातापित्यांचा सन्मान केला तसंच गुरुजनांचाही केला. त्यांना पशुपक्षांचीही भाषा येत होती. त्याचेच कारण की काय, हिंस्र श्वापदं सुद्धा त्याचे मित्र बनत असत. एकदा एक गंधर्व अप्सरासोबत फेरफटका करता करता तो गंगा तटावर आला. तिथं रेणूका उभी होती. ती त्यावर आसक्त झाली. त्यावेळेस ते दृश्य तिचा पती जमदग्नीनं पाहिलं. ते पाहताच त्यानं आपल्या सर्व मुलांना बोलावलं व आदेश दिला की त्यांनी माता रेणूकेचं शिरसंधान करावं. परंतू त्या सर्व पुत्रांनी त्यांचे पिता जमदग्नीचं काहीच ऐकलं नाही. परिणामस्वरुप त्यानं शेवटी परशुरामाला आदेश दिला व परशुरामनं आपल्या मातेसकट आपल्या भावाचंही शिरसंधान केलं. त्यावर जमदग्नी फारच खुष झाले व म्हणाले,
 “मी तुझ्या कार्यावर फारच खुश आहे. काय मागायचे असेल ते मांग.”
परशुरामनं ते ऐकलं. तसा तो म्हणाला,
“ठीक आहे. द्यायचेच असेल तर माझी माता व माझे बंधू जीवंत करुन द्या.”
 परशुरामाची अक्कलहुशारी. जमदग्नी समजले. त्यांनी तथास्तू म्हटलं व परिणामस्वरुप आपली माता व भावांना आपल्या पित्याकडून जिवंत करुन घेतलं.
परशुरामाच्या वडीलांना इंद्रानं कपिला नावाची एक गाय दान दिली होती. त्यातच भगवान दत्तात्रेयाला प्रसन्न करुन वर प्राप्त केलेला सहस्रार्जून फिरण्यासाठी निघाला असता तो जमदग्नी ऋषीच्या आश्रमात आला. त्याला कपिला आवडली व ती कामधेनू त्यानं बलपुर्वक सोबत नेली. ते पाहून परशुरामानं त्याचे शंभर हात कापून टाकले. त्याचा राग मनावर धरुन सहस्रार्जूनच्या मुलांनी परशुराम नसतांना त्याचे वडील तपश्चर्येत लीन असतांना त्यांची मान कापून टाकली. त्याचाच बदला घेण्यासाठी परशुरामनं महिष्मती नगरीवर हमला केला व आपला अधिकार जमवला. त्यातच त्यानं सहस्रार्जून वारसाच्या रक्तानं पाच सरोवर भरले व त्याच सहस्रार्जूनच्या मुलाच्या रक्तानं आपल्या पित्याचे श्राद्ध केले. त्यानंतर त्यांनी संपुर्ण पृथ्वी कश्यप ऋषींना दान दिली. त्यानंतर आपल्याजवळील सर्व आयुधं त्यानं देवराज इंद्राला दान दिलेत व तो शेवटी महेंद्र पर्वत स्थित आश्रम बनवून राहू लागले.
परशुराम शक्तीशाली होते. त्याच्याबद्दलची एक कथा अशीही. एकदा भगवान गणेशांनी परशुरामाचा अंतःपूरातून प्रवेश रोकला. परिणामस्वरुप गणेशावर परशुरामनं प्रहार केला. तो प्रहार गणेशानं आपल्या दातावर झेलला. त्या वारात गणेशाचा एक दात अर्धा तुटला. तसंच ज्यावेळी रामानं शिवधनुष्य तोडला. त्यावेळेस पृथ्वी निःक्षत्रीय केलेल्या परशुरामला पुन्हा क्षत्रियांबद्दल चिंता वाटू लागली. तेव्हा विश्वामित्र व वसिष्ठ ऋषींनी पुढाकार घेऊन त्यांना समजवले असता ते समजले.
परशुराम बाबत भिष्माचाही अनुभव आहे. ज्यावेळेस अंबा भिष्माविरोधी परशुरामकडे सहायता मागायला गेली. त्यावेळेस परशुरामनं भिष्माशी युद्ध केलं. हे युद्ध तेवीस दिवस चाललं.
 असे हे परशुराम. त्यांचा त्या काळात पराजय अटळ होता. ते शहर होते. त्याच शुरतेच्या जोरावर त्यांनी त्या काळात आपला दबदबा कायम ठेवला होता. त्यांचा जन्म अक्षयतृतीयेच्या महापर्वावर झालेला असून तो महापर्व परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो.
-अंकुश शिंगाडे
नागपूर
९३७३३५९४५०