• Mon. Jun 5th, 2023

वीटभट्टीवरील आदिवासी मुलांसोबत साजरी केली महामानवाची जयंती

वीटभट्टीवरील आदिवासी मुलांसोबत साजरी केली महामानवाची जयंती
श्री दादासाहेब गवई चॅरिटेल ट्रस्ट, खोज – मेळघाट व अमरावती स्पंदन परिवार संस्थेचे सयुक्त आयोजन
अमरावती: महामानव डॉ. बाबासाहेबांची १३२ वी जयंती श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित तक्षशिला महाविद्यालय, खोज – मेळघाट व अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कोंडेश्वर येथील वीटभट्टी परीसरातील चिमुकल्या मुलांसोबत साजरी करयात आली. यावेळी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा, रोशन प्रकाश राव यांच्या हस्ते मुलांना चित्रकलेची वही, रंगकांड्या, बिस्कीट आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले. तसेच या विटभट्टी परिसरात दररोज वर्ग घेणाऱ्या लक्ष्मीताईचाही सत्कार करण्यात आला.
शहरापासून जवळपास १२ ते १५ किलोमिटर अंतरावर अंजनगव बारी आणि कोंडेश्वर परिसरात जवळपास दिडशे ते दोनशे वीटभट्ट्या आहेत. या विटभट्टीवर काम करणारे बहुतांश मजूर वर्ग हा मेळघाटातील आदिवासी बांधव आहे. तसेच इतर जिल्ह्यातील काही भटक्या विमुक्त जमतीचे मजुर आहेत. मेळघाटात रोजगार उपलब्ध होत नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी या आदिवासी बांधवांना शहामध्ये कुटूंबासह स्थलांतर करावे लागत आहेत. परंतु त्यांच्या या स्थलांतरणामुळे त्यांची चिमुकली मुले ही शिक्षणापासून, शाळेतपासून वंचित होत आहेत. तसेच वीटभट्टीतील मातीमध्ये खेळून त्यांचे आरोग्यही धोक्यात येत आहे. त्यामुळे अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना आयसीडीएसच्या योजनेचा लाभ मिळण्यासाठी, पुर्व प्राथमिक शिक्षण मिळावे, शाळेतील विद्यार्थी व किशोर वयीन मुला मुलींचे शिक्षण नियमित सुरू रहावे यासाठी खोज – मेळघाट व अमरावती स्पंदन परिवार संस्थेतर्फे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. यामध्ये एक वही, एक अंकलीपी, पेन, स्कूल बॅग्स, चटई, फळा, खडू, मार्कर पेन हे साहित्य उपलब्ध केले होते. या सामाजिक उपक्रमात श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव प्रा, रोशन प्रकाश राव यांनीही सहभाग घेऊन महामानवाची जयंती आदिवासी मुलांसोबत साजरी केली. यावेळी प्रा. सचिन पंडित प्रशासकीय अधिकारी श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती, प्रा निलेश गणगणे, प्रा. सुभाष मुंडे, प्रा. नवल पाटील, प्रा प्रवीण वानखडे, प्रा प्रितेश पाटील, प्रा. सचिन कुमरे, उज्वल भालेकर चैतन्य सराफ, खोज संस्थेचे ऍड बंड्या साने, स्पंदन परिवार/युवा स्पंदन सिनेमा प्रोडक्शनचे संस्थापक अध्यक्ष पंकज धंदर, बिइंग आर्टिस्ट अकॅडमी च्या संचालक स्नेहा वासनिक, उपस्थित होते.
——————
आपणही करु शकता मदत.!
शैक्षणिक क्रांतीच्या दिशेचा पहिला टप्पा म्हणजे शैक्षणिक साहित्याचे वाटप, मुलांना शिकवणारे शिक्षक गरजेचे आहे. तसेच वीटभट्टी परिसरात मुलांना एकत्र बसण्याची जागा नसल्यामुळे सावली साठी तात्पुरत्या स्वरूपाचा शेड उभारण्याची गरज आहे. चार खांबाचे छोटेसे शेड निर्माण करण्यासाठी तसेच छोट्या मुलांना खेळणी देऊन, डॉक्टर मित्र असतील आरोग्य तपासणी करून मदत करून स्थलांतरीत कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेल्या या प्रवासात आपणही सहभागी होऊ शकता. त्यासाठी अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था (९०४९४९११५१) आणि खोज, मेळघाट (९८९०३५९१५४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान संस्था अध्यक्ष पंकज धंदर आणि ऍड. बंड्या साने यांनी केले आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *