• Wed. Jun 7th, 2023

जिल्ह्यात अवकाळी पावसाने 522. 8 हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अमरावती : जिल्ह्यात दि. 7 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे पाच तालुक्यांतील 522. 8 हे. आर. क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले, अशी माहिती प्राथमिक अहवालानुसार जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी 13.6 मिमी पाऊस झाला. भातकुली तालुक्यात 34.80 हे. आर., अमरावती तालुक्यात 160 हे., दर्यापूर तालुक्यात 12, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 28 व अंजनगाव सुर्जी तालुक्यात 288 अशा एकूण 522.8 हे. आर. शेतीक्षेत्रातील गहू, कांदा, मिरची, निंबू, संत्रा, आंबा, हरभरा आदी पिकांचे नुकसान झाले. मलापूर येथे वीज कोसळून एक व्यक्ती मृत होऊन दोन व्यक्ती जखमी झाल्या. जिल्ह्यात अवकाळी पावसाने 111 घरांची अंशत: व एका घराची पूर्णत: अशा एकूण 112 घरांची व दोन गोठ्यांची पडझड झाली. पशुधनात दोन जनावरे दगावली.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *