Header Ads Widget

आजपासून दापोरी येथे लालदास बाबांच्या पुण्यतिथि महोत्सवास् सुरुवात

  * ई. सन १९२० पासून लालदासबाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची परंपरा
  * पुण्यतिथी महोत्सवानिमित्त लाखो भक्तांचा जनसागर उसळनार
  * लालदासबाबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

  मोर्शी (तालुका प्रतिनिध) : मोर्शी तालुक्यातील दापोरी या गावाला श्री संत लालदासबाबा यांनी आपली कर्मभूमी निवडून विशेष कार्य केले. त्यामुळे दापोरी या गावाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

  श्री संत गजानन महाराज यांच्या समकालीन कालखंडात दापोरी येथे प्रगट झालेले श्री संत लालदास बाबा यांचा १०३ वा भव्य पुण्यतिथी महोत्सव कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १८ मार्च ते २५ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात दापोरी नगरीत संपन्न होत आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले लालदासबाबा यांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा कारण्याकरिता दापोरी नागरीमध्ये महाराष्ट्र, मध्यप्रदेश येथून व परिसरातील पंचक्रोशीतील लाखो भाविक सहभागी होत असून चैत्र शुद्ध चतुर्थीला लालदासबाबा यांच्या समाधीचा अभिषेक करून तिर्थस्थापणेने या सप्ताहाची सुरुवात करण्यात येत असून फाल्गुन कृष्ण द्वादशी पासून सुरु होणाऱ्या पुण्यतिथी महोत्सवात काकडा, आरती, भागवत प्रवचन, हरिपाठ, अखंड विना वादन, कीर्तन, आरती, भजन, यासह विविध कार्यक्रम व नवनवीन स्पर्धांचे उपक्रम राबविले जातात . दापोरी नगरीमध्ये लालदासबाबा बद्दल श्रद्धेची भावना असून या पावन भूमीत पुण्यतिथी महोत्सवाला येणाऱ्या लाखो भक्तांची प्रचंड वर्दळ असते.

  दापोरी येथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत लालदास बाबा यांचा १०३ वा भव्य पुण्यतिथि महोत्सव दापोरी नगरीमध्ये सालाबादा प्रमाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असून या महोत्सवा निमित्य संगीतमय सदृश्यमय श्रीमद् भागवत कथा सप्ताह मोठ्या उत्साहात सुरु होणार असून ह भ प श्री स्वामी मुकुंद महाराज धोटे भगवताचार्य यांच्या मधुर वानीतून सुरु होणार आहे.

  या पुण्यतिथी माहोत्सवा निमित्य दापोरी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दापोरी नगरी मधे आनंदाचे व उत्साहचे वातावरण असून रोज हरिपाठ ,काकड़ा आरती, सत्संग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रार्थना, खंजेरी भजन, अवधुति भजन, यासारखे विवध धार्मिक कार्यक्रम बाराही महिने सुरु राहत असून या भगवत सप्ताहाला रोज हजारो भक्तांचा प्रतिसाद मिळत असून दापोरी नगरीमधे २५ तारखेला लालदासबाबा यांच्या पालखिचि भव्य शोभा यात्रा निघणार असून लालदास बाबा यांच्या पुण्यतिथि महोत्सवाला लाखो भक्तांचा जनसागर उसळणार आहे. लालदास बाबा यांच्या पुण्यतिथी महोत्सवात मोठ्या संखेणे उपस्थित राहन्याचे आवाहन लालदास बाबा संस्थान चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी मंडळ, व दापोरी येथील समस्त गावकारी मंडळी यांनी केले आहे.

  कोरोना काळामध्ये शासनाच्या मदतीला धावणारे संस्थान

  दापोरी येथील लालदासबाबा देवस्थान र नं ए १८४३ ता मोर्शी जी अमरावती यांच्या समाधी स्थळाला शासनाचा 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा मंजूर झाला असून या समाधी स्थळाच्या वृक्षाचे रूपांतर वटवृक्षात झाले असून देशात कोरोना १९ या रोगाने थेमान घातले असल्याने देश प्रचंड अडचणीत सापडलेला असताना कोरानावर मात करण्याकरीता सामाजीक बांधिलकी जोपासत एक हात मदतीचा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये ५१ हजार रुपयांचा धनादेश मदतनिधी लालदासबाबा संस्थानतर्फे जमा करून शासनास सहकार्य करण्यात आले होते.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या