Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

मराठी भाषा विद्यापीठ एक स्तुत्य निर्णय

    भारतातील वेगवेगळ्या राज्यांत त्या-त्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना झाली. त्‍याच प्रकारे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापन व्‍हावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत होती. मराठी विद्यापीठाची सर्वप्रथम कल्पना १९३३ साली नागपुरात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात मांडण्यात आली.रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापन करावे, ही मागणी अनेक वर्षांपासून करण्‍यात येत होती. ती अखेर पूर्ण झाली आहे.

    मराठी भाषेतील आद्यग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला, ते वाजेश्वरी स्थान रिद्धपुरात आहे. चांदूर बाजारपासून मोर्शी मार्गावर नऊ किलोमीटरवर रिद्धपूर आहे. महानुभाव संप्रदायाचे रिद्धपूर तीर्थस्थान आहे.

    मराठी भाषेची सद्य:स्थिती, मराठी भाषाविषयक धोरणाची उद्दिष्टे यावर भाषेचे २५ वर्षांचे धोरण निश्चित करण्याचे प्रयत्‍न काही वर्षांपूर्वी शासन स्तरावरून सुरू करण्‍यात आले होते. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखालील भाषा सल्लागार समितीने मराठी भाषा विकासाचे धोरण (मसुदा २०१४) राज्यासमोर ठेवले. २५ वर्षांसाठी मराठी भाषेचे धोरण निश्चित करताना मराठी भाषा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचे प्रस्तावित मसुद्यात नमूद करण्‍यात आले होते. हिंदी भाषेचा विकास व्हावा म्हणून महाराष्ट्रात वर्धा येथे महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची निर्मिती करण्‍यात आली. सरकारने रामटेक येथे संस्कृत भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन केले आहे. भारतातील वेगवेगळ्या राज्यांत त्या-त्या भाषेचे संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठांची स्थापना झाली. त्‍याच प्रकारे मराठी भाषा विद्यापीठ स्‍थापन व्‍हावे, अशी अपेक्षा व्‍यक्‍त करण्‍यात येत होती.

    स्वातंत्र्योत्तर काळात पुणे विद्यापीठ स्थापन झाले, तेव्हा हे विद्यापीठ मराठी विद्यापीठ व्हावे, अशी भावना इतिहास संशोधक, लेखक व या विद्यापीठाचे कुलगुरू दत्तो वामन पोतदार व इतरांनीही व्यक्त केली. 'मराठी विश्वकोश मंडळा'ची निर्मिती हे मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी उचललेले पहिले पाऊल होते. पण त्यानंतर मराठीच्या विकासासाठी दुसरे पाऊल दुर्दैवाने कोणत्याही सरकारने टाकले नाही.मात्र शिंदे फडणवीस सरकारनेरिद्धपूरचे हे महत्व लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

    अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूरहे महानुभाव पंथाचे प्रमुख केंद्र असून मराठी साहित्याच्या विकासात त्याचं महत्त्वाचं योगदान आहे. रिद्धपूरचं हे महत्व लक्षात घेऊन त्या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना करण्यात येणार असल्याची महत्त्वाची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात करण्यात आली.

    मराठी भाषेतील आद्य साहित्यिक अशी ओळख असलेल्या चक्रधर स्वामींच्या नावानं रिद्धपूर या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. या ठिकाणी मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करावं ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात येत होती.

    महानुभाव संप्रदायाचे साहित्याला योगदान

    मराठीतील पहिला आद्यग्रंथ म्हणून ओळख असलेला लीळाचरित्र हा ग्रंथ रिद्धपूरमध्ये उदयास आला. म्हाइंभटानी तो वाजेश्वरी या ठिकाणी लिहिला असल्याची नोंद आहे. मराठी साहित्याला महानुभाव पंथीयांचा मोठा वारसा लाभला असून महानुभाव पंथाशी संबंधित जवळपास ३० हजार ग्रंथ असल्याची नोंद आहे.

    रिद्धपुर हे अमरावती जिल्ह्यात असून श्रीक्षेत्र रिद्धपूर ही महानुभावपंथांचीच नव्हे, तर मराठी वाङ्मयाचीसुद्धा काशी म्हणून ओळखली जाते. या भूमिमध्ये मराठीतील पहिला हस्तलिखित आद्यग्रंथ ‘लीळाचरित्र’ लिहिला गेला. याठिकाणी लीळाचरित्रासह स्मृतिस्थळ, गोविंदप्रभू चरित्र, दृष्टांतपाठ, सूत्रपाठ, मूर्तीप्रकारासारखे ग्रंथ लिहिले गेले.त्याचप्रमाणे सहा हजारहून अधिक ग्रंथ या ठिकाणी लिहले गेल्याने या भूमीला विशेष महत्व आहे.

    रिद्धपुर हे श्री गोविंदप्रभू, चक्रधर स्वामी, श्री नागदेवाचार्य यांच्यासारख्या महापुरुषांनी वास्तव्य केलेली भूमी आहे. माहीम भट्ट, केशीराज व्यास, महदाईसा यांच्यासारख्या प्रज्ञावंतांनी याच ठिकाणी मराठी भाषेला झळाळी दिली. समतेचा विचार १३ व्या शतकात याच मातीत जन्मलेल्या गोविंदप्रभुंनी मांडला. चक्रधरांना हिंदू धर्मातील अस्पृश्यता, स्त्री दास्य, मांसाहार यासारख्या गोष्टी मान्य नव्हत्या. आचारधर्माचा आत्मा होऊन बसलेली मूल्ये त्यांना मान्य नसल्यामुळे श्री चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना रिद्धपुरमध्ये केल्याचे अनुयायी सांगतात.मराठीही राज्याची राजभाषा होऊन अर्धशतकावर कालावधी झाला, भाषेचे विद्यापीठ स्थापन केले नाही. ही उणीव भरून काढणे व मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे देखील आता रास्त होणार आहे.

    प्रा डॉ सुधीर अग्रवाल
    ९५६१५९४३०६
    --------------

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    --------------------

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code