Recent in Technology

Advertisement

Breaking News

बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा असणारी शहरात घटना.!

  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती जिल्ह्यात सातत्याने महिला व मुलींवरील अत्याचारात वाढ होत आहे अशीच एक घटना बाप आणि लेकीच्या पवित्र नात्याला काडी मा असणारी शहरात घडल्याने चर्चेला एकच उदान आले आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीत अत्याचाराच्या तीन घटनांची नोंद चोवीस तासांमध्ये झाली. तिन्ही घटनांमध्ये पीडित मुली या अल्पवयीन असल्याने या घटना चिंता वाढवणाऱ्या आहे.

  या घटनेबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बापाने मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल करण्यात आली असून त्या नराधम बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडे दोन, तर विलग झालेल्या पत्नीकडे एक मुलगी राहत होती.हा वासनांध बाप हात मजुरीचे काम करतो. या नराधमाने सप्टेंबर २०२२ मध्ये निद्रावस्थेत असलेल्या मुलींपैकी मोठ्या मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अचानक आवाज आल्याने धाकट्या मुलीला जाग आली. तिने पित्याला या घाणेरड्या कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तसेच या वासनांध पित्याला धाकट्या मुलीने समजावून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला. मात्र, बापाने या धाकट्या मुलीचे ऐकले तर नाहीच, उलट वासनेने अंध झालेल्या या नराधमाने या धाकट्या मुलीचे हात-पाय बांधले आणि त्याच मुलीसमोर मोठ्या मुलीवर अत्याचार केला.

  मोठ्या बहिणीवर होणारा अत्याचार बघून ही छोटी बहीण रडू लागली. मात्र बापाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे दोघीही मुली घाबरून होत्या. दरम्यान, एके दिवशी दोघींच्याही सहनशीलतेचा अंत संपला आणि दोघींनी मोठे धाडस केले. त्यांनी मनाशी पक्के करत नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठले. यावेळी त्यांनी उपस्थित अंमलदारांना ही संतापजनक आणि बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना सांगितली. ती ऐकून उपस्थित सगळ्यांनाच हादरा बसला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणातील आरोपी बाप पसार आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code