Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कुकरची शिट्टी...

  होईच्या सनाले, पावणीन आली साई
  बयनीन सयपाकाची, भलतीच केली घाई
  मी होतो बेड वर, साईन मले मारली मिठ्ठी
  झाली होती घरातल्या कुकरची शिट्टी //१//
  इन वरन भात लावला, अनं सांभाराले गेली
  साई दाजी दाजी बोंबलत, आंगावरच आली
  डोये फिरवे गरगर, मने इथ धरा मले
  म्या मतल कशी करत, काय झालं तुले
  एक हात दाखवे,...वो-वो करून
  माग पुढ सरके, माई कंबर धरून
  तिची बहीण गेलती बाहेर, जमली मनल भट्टी //२//
  कड फेरला मिया, लावून होतो कंट्री
  संबार घेऊन बायकोची, दारात झाली एंट्री
  टेली फिल्म तिन, दुरनच पायली
  कंबरीले पदर खोसुन, उभी रायरी
  मी माया घोरात, मले नाई सुचे
  तिच तिले मायीत, ते अजून अजून घुसे
  सीन पाहून सारा, इन घेतली कट्टी //३//
  दोन दिवस सारखी, फुगाटून रायली
  माया काय बापाची, चौथाई चालवली
  चिमुन जाईल उद्या, मुरु घातला चुना
  दाखव बर यात, मा काय गुन्हा
  झाला मतलं सयपाक, त खेकाऊन धावली
  बर झालं सायीन, मायी बाजू घेतली
  मने याच्या साठी घेतली का, मेडिकलवर सुट्टी //४//
  बाई त्यातले काय बोलत, घे माय आयकुन
  माणसाच्या जातीले,पायले पायजे निरखून
  मले वाट्टे बाई तुया, गैरसमज झाला
  रेल्वेसारखा आवाज माया, कानावर आला
  इंजिन होय म्हणून, मी बेडवर चंगली
  घाबरून दाजीच्या, आंगाले झोंबली
  मले काय माहित मी, खेळ्यातली पोट्टी //५//
  होळी स्पेशल....
  -रमेश राऊत
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code