- कुऱ्हा/नितीन पवार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती सलग्नित श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिर दत्तकग्राम मंगरूळ दस्तगीर येथे उत्साहात संपन्न झाले.
यानिमित्त विविध बौद्धिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाले.शिबिराचे उद्घाटन स्थानिक महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री.शरदराव इंगळे यांच्या शुभहस्ते झाले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद आंबटकर तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त सुदामराव नागपुरे,सुधाकरराव बांते, कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांतभाऊ शेलोकार, सरपंच सतीशराव हजारे, श्री नरेशराव सावंत, पंचायत समिती सदस्य माधुरीताई दुधे, शालिनीताई नागपुरे,सरिताताई डाफ, माधुरीताई भोंगे, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश इंगळे, सूत्रसंचालन सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा श्यामला वैद्य यांनी केले.या शिबिरादरम्यान दैनंदिन कार्यक्रमात श्री प्रमोद आंबटकर यांनी शिबिरार्थयाना योगाभ्यास व प्राणायामाचे धडे दिले.तसेच दररोज प्रभात फेरी, श्रमदान,गावकऱ्यांशी गटचर्चा, प्रार्थना व स्फूर्ती गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमा सोबतच श्री संत शंकर महाराज भजन मंडळ पिंपळखुटा आणि महिला भजन मंडळ मंगरूळ दस्तगीर यांचे भजनाचा कार्यक्रम,स्वयंसेवक कुणाल मडामे आणि श्रीसंत शंकर महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि संच यांचे सुश्राव्य कीर्तन तसेच प्रफुल्ल डाफ यांच्या गीत गायनाचा कार्यक्रम झाला.
बौद्धिक सत्रात महाविद्यालयीन विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन,युवकांसाठी स्वामी विवेकानंद, राष्ट्रसेवा ही परमो धर्म, पर्यावरण संवर्धन (नदी आणि मानव) या विषयावर अनुक्रमे प्रा. विशाल मोकासे,श्री. सुधाकर कांबळे,प्रा.डॉ. मनोज सपकाळ,प्रा.सुरेश सांगळे,श्री. मंगेश मारोडकर,प्रा. विजय कामडी,प्रा. सुषमा थोटे यांनी मार्गदर्शन केले.
शिबिरा दरम्यान शिबिरार्थींनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर,श्री गणपती महाराज मंदिर,ग्रामपंचायत, राष्ट्पिता महात्मा जोतिबा फुले अभ्यासिका,मंगला माता मंदिर इत्यादींना भेट देऊन सरपंच सतीश हजारे यांचेकडून ऐतिक ऐतिहासिक माहिती तसेच स्पर्धात्मक परीक्षेची माहिती जाणून घेतली. सोबतच पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीरला भेट देऊन पोलीस विभागाची कार्य प्रणाली समजून घेतली.यावेळी ठाणेदार सुरज तेलगोटे यांनी विविध विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.श्रमदानांतर्गत शिबिरार्थीनी गाव परिसरात शेततळे खोदले तसेच गावातील स्मशानभूमीची साफसफाई केली.
शिबिराचा समारोपीय कार्यक्रम स्थानिक महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष श्री शरदराव इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रशांत शेलोकार प्राचार्य डॉ. सुभाष मुरे सरपंच सतीशराव हजारे, सरिताताई डाफ, माधुरीताई भोंगे, डॉ. रवींद्र डोंगरे सेवानिवृत्त प्राचार्य प्रमोद आंबटकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विशेष सहकार्य केल्याबद्दल अरूणाताई व नरेशराव सावंत, शोभाताई व अरुणराव निवल यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.शिबिराचे अहवाल वाचन कु.वैष्णवी बुराडे, प्रास्ताविक सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. शामला वैद्य सूत्रसंचालन कु. आरती शिवरकर तर उपस्थित मान्यवर आणि सात दिवसांमध्ये विशेष सहकार्य केलेल्यांचे आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी मानलेत.शिबिरामध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी, शिबिरार्थी सहभागी झाले होते.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–