• Fri. Jun 9th, 2023

समतेची क्रांती – महाड सत्याग्रह

    महाडच्या चवदार तळ्याचा ऐतिहासिक सत्याग्रह २० मार्च १९२७ रोजी झाला.त्यानंतर अनेक वर्षे हा दिवस ‘ समता दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली.परंतु समतेसाठी ‘ जलक्रांती ‘ आंदोलन करणारे होते समतेचे खंदे पुरस्कर्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर.

    इ.सन.१९२६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले.इ.स.१९२७ च्या सुमारास त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली.महाड येथील चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

    देशातील दलितांना उच्चवर्णीयांकडुन खुप अपमानास्पद वागणूक मिळत होती. अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास किंवा पिण्यास साधा अधिकार देखील नव्हता. ४ ऑगस्ट १९२३ रोजी ब्राम्हणेतर पक्षाचे नेते सी.के.बोले यांनी मुंबई प्रांतांच्या विधिमंडळात एक ठराव पास करुन घेतला. त्यानुसार सार्वजनिक पाणवठे, धर्मशाळा,विद्यालये,बगीचे इत्यादी ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असे ठरले.या ठरावानुसार महाडच्या नगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी ‌खुले केल्याचे जाहीर करण्यात आले.परंतु स्पृशांनी अस्पृश्यांना तळयातुन पाणी भरु दिले नाही. त्यामुळेच अस्पृशांमध्ये धाडस आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्यातील पाण्यासाठी सत्याग्रह करण्याचे ठरविले.

    डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १९ मार्च व २० मार्च महाड येथे कुलाबा परिषद भरवली .या परिषदेचे अध्यक्ष स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर होते.या परिषदेस सुरेंद्र चिटणीस , संभाजी गायकवाड,अनंत चित्रे, रामचंद्र ‌मोरे , गंगाधर पंत सहस्त्रबुद्धे आणि बाबुराव जोशी ‌हे दलितेतर सवर्ण व ब्राह्मण नेते होते. या परिषदेत अस्पृश्यतेचा धिक्कार करुन पुढील ठराव पास करण्यात आले होते.

    १) स्पृश‌ (सवर्ण) लोकांनी अस्पृश्यांना आपल्या नोकरीत ठेवावे.
    २) स्पृश लोकांनी अस्पृश्यांना त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार बजाविण्याच्या कामात मदत करावी.
    ३) मृत जनावरे ज्यांची त्याने ओढावीत.
    ४) स्पृशांनी अस्पृश्यांच्या विद्यार्थ्यांना वार लावुन ‌जेवन देणे.

    परिषदेच्या या सभेमध्ये असे ठरले की,सर्व प्रतिनिधी तेथे‌ जाऊन पाणी ‌प्यायचे त्यानुसार दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच २० मार्च १९२७ रोजी महाड परिषदेतील सर्वांनी आपला मोर्चा चवदार तळ्याकडे ‌वळवला . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वप्रथम तळ्यातील पाणी ओंजळीने पिले. त्यानंतर सत्याग्रहातील त्यांच्या सर्व अनुयायांनी त्यांचे अनुसरण करुन ओंजळीने पाणी प्यायले.

    आतापर्यंत समतेसाठी अनेक आंदोलने झाली आहेत.भारतीय राज्यघटनेने या देशातील सर्व जाती-धर्मांना समान हक्क प्रदान करण्यात आला.पण पाण्याच्या प्रश्नावरून जातीय आणि धार्मिक अस्मिता कशा प्रकारे उफाळुन येतात.याची उदाहरणं आपण आजही समाजात पाहत आहोत. तथाकथित सवर्ण, उच्चधर्मीय, उच्चजातीय लोकांकडून केला जाणारा दुजाभाव, द्वेष, अत्याचार अजुनही समाजात पाहताना दिसत आहे.

    चवदार तळ्याचा सत्याग्रह होत असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकांना उद्देशून म्हटलं होतं.की,” चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही अमर होऊ, अशातला भाग नाही.आजपर्यंत चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो, म्हणून तुम्ही, आम्ही काही मेलो नाहीत.हा संगर पाण्यासाठी नसुन तो मानवी जिवितांसाठी आहे.समतेसाठी आमचा लढा आहे.हे विसरून चालणार नाही.

    जरी महाडचा सत्याग्रह झाला असला तरी त्याला असलेला सनातन्यांचा विरोध पाहता तळ्यापासुन शोषित जनता अजुन दुरच होती.सनातन्यांनी तळे ” शुध्द”केले होते.आता पुन्हा तिथे अधिवेशन घेऊन आपला समतेचा हक्क मिळवायचा निर्णय घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा हाती घेतला.

    २५ आणि २६ डिसेंबर १९२७ रोजी.१) चवदार तळ्याचे पाणी हक्काचे पाणी अस्पृश जनतेला मिळावे.आणि २) हिंदु धर्मांतील विषमतेचा आधार असलेल्या मनुस्मृतीचे दहन करायचे.असा कार्यक्रम घेण्यात आला. आणि २५ डिसेंबर १९२७ रोजी महाडच्या भुमीत “मनुस्मृती”दहन केली.व अनिष्ट रूढी परंपरा यांना‌ बाबासाहेबांनी कायमचीच मुठमाती दिली. हे आपण विसरता कामा नये. अखेर चवदार तळ्याच्या पाण्याची न्यायालयीन लढाई पुढे १७ मार्च १९३७ मध्ये पुर्ण झाली आणि अस्पृश्यांना आपला हक्क डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवुन दिला. म्हणुन,या ठिकाणी, “चवदार तळ्याचा सत्याग्रह” यावर माझ्या चार ओळी…!

    पाणी नव्हतं पिण्यास..!
    मुक्त केलेस तू दार..!
    तहानलेल्या जनतेस..!
    आज हे तळे चवदार..!!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयमी नेतृत्वांनी, कुशाग्र बुद्धीच्या प्रखर विचारांनी समतेचा लढा यशस्वी केला. महाडचा सत्याग्रह ही इतिहासात ऐतिहासिक क्रांती ठरली. आणि हिच क्रांती तुम्हां ,आम्हाला, समतेसाठी उभारलेल्या चळवळींना लढण्यासाठी वैचारिक बळ देवुन गेली आहे.

    – प्रविण खोलंबे
    संपर्क मो.८३२९१६४९६१
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

‌‌

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *