• Wed. Sep 27th, 2023

रासेयो शिबिरार्थ्यांनी केली स्मशानभूमीची साफसफाई

    कुऱ्हा/नितीन पवार

    मंगरूळ दस्तगीर येथील श्री संत लहानुजी महाराज मंदिरात श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे सात दिवशीय विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    या शिबिरा दरम्यान सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झालेत. यादरम्यान श्रमदान अंतर्गत शिबिरार्थयानी येथील स्मशानभूमीची साफसफाई केली. स्मशानभूमी परिसरातील विविध झाडे झुडपे कापलीत.अस्ताव्यस्त असलेला कचरा गोळा केला आणि योग्य अशी विल्हेवाट लावली.स्मशानभूमीत जाण्यात लोक विशेषतः महिला जाण्यास धजावत नाही.अशा परिस्थितीत स्मशानभूमी साफसफाई करिता विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनी/ स्वयंसेविका यांनी धाडस करीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व गावकऱ्यांसमोर नवा पायंडा घालून दिला.स्मशानभूमीची साफसफाई केल्याबद्दल गावकऱ्यांनी सुद्धा शिबिरार्थ्यांचे भरभरून कौतुक केले.

    साफसफाई करतेवेळी गावकरी विशेषतः महिला वर्ग उत्सुकतेने बघत होते.या सफाई अभियानात सरपंच सतीश हजारे श्री प्रमोद आंबटकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश इंगळे सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा.शामला वैद्य,प्रा. सुषमा थोटे गटप्रमुख कु.वैष्णवी बुराडे, आशिष शिवरकर अनमोल मुन, पल्लवी उके,वैष्णवी गावंडे,पूजा मेश्राम, आरती शिवरकर, आचल दिघोरे, तेजस्वी मेश्राम, वैभव ढेवळे, ईश्वर मेश्राम, संमेक मून,करिष्मा शिवरकर मधुर पालीवाल,शुभम बोरकर, यश धारणे, कीर्ती वानखडे, संगीता शिवरकर, ऐश्वर्या शेंडे, पूजा इंगोले, पूजा मेश्राम, प्राजक्ता शिदोळकर, प्रियंका मराठे, आचल ढाणके, पायल कामठे, ऐश्वर्या मराठे, यांचे सह गावकरी सहभागी झाले होते.

    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,