• Fri. Jun 9th, 2023

मंतरलेले दिवस.!

  रात्रीच्या गर्भातून नव्या सूर्याचा उदय होत होता.सकाळची उषःकाल नव्या नवलाईने नटून येत होती .विसाव्याला आलेली खग किलबिलाट करून मनसोक्तपणे अवकाशात विहार करीत होती. कामाच्या थकव्याने मला थोडा आराम हवा असं वाटत होतं. तरी पण माझे ध्येय गाठण्यासाठी मला आराम करून चालणार नव्हते. माझे जीवन निरंतर चालत राहणारे असावे असा चंग मी माझ्या मनात बानला होता.

  दाहीदिशांनी संकटाचे वारे झेपावत होते .डहाळीला आलेले कोमल फुल वावटळीच्या झोताने गळून पडणार का..? अशी भीती मला वाटत होती. जीवनाचा नवा पथ पादाक्रांत करण्याची जिद्द मनाला नवी उभारी देत होती. नव्या जीवनाला सुरुवात करत असताना येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद माझ्यात निर्माण होत होती.

  डि एड.चं शिक्षण संपलं होतं. शासनाने भरतीवर अघोषित बंदी लावली होती. माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आर्थिकतेचा निर्माण झालेला होता. नागपूरच्या गगनचूंबी शहरात स्वतःच अस्तित्व शोधत मला जगाव लागत होतं. धकाधकीच्या आयुष्याला शांततेची किनार मिळत नव्हती. शहरातील वातावरणाचा प्रभाव माझ्यावर पडत होता. जठराच्या पेशीतील भूक कशी भागवावी हा एक यक्षप्रश्न माझ्यासमोर उभा होता. शिक्षणाची दिशा संपली नव्हती. तशी ती संपणारच नव्हती. मी आजन्म विद्यार्थी राहीन हाच मुलमंत्र मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरा कडून शिकलेला होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिका ! संघटित व्हा!! व संघर्ष करा!!! हा मूल मंत्र माझ्या धमनीधमनित संचारत होता. शिक्षणाबरोबरच मी समाज कार्यामध्ये कधीकधी सहभागी होत होतो.

  दिवस मावळाच्या आतमध्येच आज कामावर लवकर सुट्टी झाली होती. सारे कामगार ऑफिस बॉय घरच्या ओढीने लागले होते. चौकातील सिग्नल काही ठिकाणी बंद होते. त्यामुळे मी माझी सायकल जोरात जोरात चालवत होतो. मी लवकर रूमवर येऊन थडकलो .पाणी प्यालो, हात पाय धुतले, आणि “बुद्ध आणि त्याचा धम्म” हे पुस्तक हातात घेतल त्यामधील एक प्रकरण वाचत असतानाच माझा मित्र दिलीप आणि त्याचे बाबा रूमवर आले.

  काही दिवसापूर्वी मित्राच्या बाबाचे मेडिकलला ऑपरेशन झाले होते. त्या ऑपरेशन चे नवीन ड्रेसिंग करण्यासाठी पुन्हा ते आले होते .मी पाणी भरून घेतले. काही विचार विनिमय केला. आजाराबाबत मी विचाराना केली .त्यानंतर गावाकडल्या गोष्टी झाल्या. काही वेळानं मित्राला म्हणालो,’मला एका कार्यक्रमाला जायचं आहे थोडा उशीर होईल.’ मित्र मला ठीक आहे.लोकमत भवनातील अकराव्या मजल्यावर चित्रकलेचा स्लाईड शो पाहण्यासाठी मला हजेरी लावायची होती.तसा बेत मी पूर्वी आकलेला होता. मी ग्रंथालयाकडे जाऊन पुन्हा पेपर घेतला आणि बातमीची शहनिशा केली. माझी रफेट पुन्हा लोकमत भवनकडे वळवली.

  आभ्राछादीत आभाळाने पावसाची रिपरीत सुरू केली होती. दुपारच्या काही काळात पावसाच्या सरीने थोडा गंधवाह दिला होता. सायकल स्टैंडवर लावली. मी लोकमत भावनातील लिफ्टकडे वळलो. उषा कॅटरला माझे काम असल्याने तेथे काम करणाऱ्या व्यक्तीने मला जागा दिली. मी अकराव्या मजल्यावरची बटन दाबायला सांगितली. तो म्हणाला, अकराव्या मजल्यावर काय आहे. मी म्हणालो, प्रोग्राम आहे ….तो आ वाचून माझ्यासमोर उभा होता.

  अकरावा मजला कधी आला हे मला कळलेच नाही. अकराव्या मजल्यावरून खाली डोकावून पाहिला तर माणसे छोटी छोटी दिसत होती. कार्यक्रमाला बराच उशीर होता. कारण पाहुणे आले नव्हते. भारतातील बहुतेक कार्यक्रम उशिरा सुरू होतात. त्याचा फटका कार्यक्रमावर बसतो.मी नागपूरचे आवलोकन करत होतो. जवळच असलेली दीक्षाभूमीचा स्तूप मोठ्या दिमाखात आपलं तेजप्रकट करत होता. विमानाच्या आवाजाने कर्ण दोष होईल का असे वाटत होते.अकराव्या मजल्यावर पाहताना मनाला भीती वाटत होती. उड्डाणपुलाचे काम जोरात सुरू होते. गरीब, कष्टकरी व कामगार यांच्या घामावर नागपूरच्या वैभवात वाढत होत होती. पण त्यांच्या जीवनाचे आर्थिक प्रश्न सुटत नव्हते.

  पंधरा मिनिट होऊन गेली. कार्यक्रम सुरू झाला. विद्यार्थी व पाहणाऱ्यांची गर्दी वाढली. मी बाहेरच उभा राहून निसर्गाचा व नागपूरच्या विलोभनीय वातावरणाचा दर्शन घेत होतो. विमानाचे आवाज ऐकू येत होते. चित्रफितीवर कार्यक्रममधून रवींद्रनाथ टागोरच्या चित्रकलेच्या मनोभावनेचे दर्शन घडत होते. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रकलेचा उत्तम नमुना मला प्रथमच पाहत आला. पण या कार्यक्रमाला श्रोते मंडळी जास्त वेळ थांबू शकले नाही. कारण कार्यक्रमांमध्ये असलेली जी तत्परता ती त्यांच्यामध्ये दिसू शकली नाही.

  कार्यक्रम संपला मी आपली सायकल घेतली .सरळ रूमकडे प्रस्थान केले. आभाळ गर्द मेघांनी भरून गेलं होतं. रात्रीचे दहा वाजले होते. मित्रांची आठवण येत होती. अंधाराला चिरत माझी सायकल वाट काढत होती. नागपूर शांत शांत होत होतं. मोक्षधामावर एकही चिता पेटलेली नव्हती.

  रूमवर आल्यावर शेजारच्या मित्रासोबत जेवण केलं.मित्रांनी व त्याच्या बाबांनी आणलेल्या डब्यावर आपली भूक भागवली. माझ्याकडे पैसे नव्हते मी अकरा वाजता पैसे मागायला मित्राकडे गेलो. तर तो मित्र तापाने फणफणत होता. माझे तेल पण संपलेला होते. मित्र व मित्रांचे बाबा हे असल्याकारणामुळे उद्याच्या जेवनाचा प्रश्न माझ्यासमोर पडलेला होता. मी पुन्हा माझी परेट दुसरीकडे वळवली. थोडा फेरफटका मारत असताना अचानक माझा मित्र मला भेटला.

  अरे, कुठे फिरतोस…
  अरे ,कुठे नाही …
  मित्राने विचारले , काही अडचण आहे का ?
  त्याला मी माझी खरी हकिकत सांगितली…त्याने माझ्या हातावर २०० रूपये ठेवले.
  मी त्याचे धन्यवाद मानले.पुढील महिन्यात तुला परत करेन..
  मित्र म्हणाला,काळजी करू नकोस देशिल पैसे आल्यावर…तो आपल्या गल्लीने पुढे निघाला .मी रूमच्या दिशेनं निघालो.

  मी रूमवर आलोय.मित्र व त्याचे बाबा आराम करत होते .दरवाजाला कडी नसल्याने मी आत मध्ये गेलो आणि कपडे बदलले.डोळे झोपेने अधीन झाले होते.पृथ्वीच्या पृष्ठभागावर अंग अलगद ठेवून मी निझलो. सकाळचे पाच केव्हा वाजले ते मला समजलेच नाही. जीवनाच्या अशा खडतर आयुष्याकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा ते मंतरलेले दिवस मला आजही प्रेरणा देतात.त्यावेळेस माझीच कविता मला जगण्याचे नवे बळ देते.

  जिंदगी तू कभी हार ना नही ।
  किसी भी तकलीफो मे ।
  बनाये रखना ऐसा जज्बा।
  हार जाये सब कठिणाई…..।
  -प्रा. संदीप गायकवाड
  नागपूर
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *