• Mon. Sep 25th, 2023

जाणून घ्या लिंबू पाणी पिण्याचे फायदे..!

    * आपल्यापैकी अनेकांना चहा किंवा कॉफी ही सकाळी झोपेतून उठल्यानंतर लागते.पण त्याऐवजी जर आपण लिंबू पाण्याने जर दिवसाची सुरुवात केली तर निश्चितच ती उत्तम होऊ शकते.
    * सकाळी उठल्यावर कोमट किंवा गार पाण्यात लिंबू पिळून ते प्यायले तर आपल्याला शरीराला त्याचे खूप फायदे होऊ शकतात.
    * लिंबू हे शरीरातील जे एंजाइम्स असतात त्यांच्या कार्यासाठी अतिशय उत्तम असतात त्यामुळे शरीरातील विशेषतः यकृतामधील विषद्रव्ये ही शरीराबाहेर फेकली जातात.
    * ज्या व्यक्तींना वारंवार डोकेदुखी व थकवा हे त्रास असतात त्यांच्यासाठी लिंबू पाणी हा एक उत्तम पर्याय आहे.
    * शरीरामध्ये कोणत्याही आजाराचा अटकाव करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत असणे आवश्यक असते.व त्यासाठी जीवनसत्व सी हे महत्त्वाचे असते.
    * लिंबाच्या रसामध्ये जीवनसत्व सी हे विपुल प्रमाणात असते.
    * ज्या व्यक्तींना वारंवार छाती जळजळ होणे, पोटात वायू होणे, ढेकर येणे अशी लक्षणे असतात त्यांच्यासाठी लिंबाचा रस हा अतिशय उत्तम आहे.
    * लिंबाच्या रसामुळे पचनास मदत होते. कारण लिंबाच्या रसामुळे शरीराच्या पतनसंस्थेतील विषद्रव्ये ही बाहेर पडली जातात व पचन हे सुलभ होते.
    * वजन कमी होण्यासाठी लिंबू पाणी कसे कारणीभूत आहेत ते जाणून घेऊयात.
    * लिंबा मध्ये आणि इतर फळांमध्ये पेक्टीन नावाचा तंतुमय पदार्थ असतो त्यामुळे पोट भरल्याची भावना जाणवते.
    * एक पेलाभर लिंबू पाणी प्यायल्यास जेवण कमी जाईल व त्यामुळे काही प्रमाणात उष्मांक कमी झाल्याने वजन कमी होण्यास मदत होईल.
    * लिंबू हे आम्ल प्रकृतीचे असते त्यामुळे लिंबाचं नुसता रस न खाता तो पाण्यातून घेणे अधिक हितावह.
    -डॉ. सौ. गौरी बाचल
    ————–
    Tag :#Lemon Drink, #article
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,