• Tue. Jun 6th, 2023

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा योजना

    गौरव प्रकाशन वृत्त संकलन

    अमरावती (प्रतिनिधी) : कृषी पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आत्मनिर्भर भारत अभियानात महत्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. काढणी पश्चात व्यवस्थापन सुविधा व सामूहिक शेती सुविधा निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन मिळण्याबरोबरच या योजनेतून कृषी प्रक्रिया उद्योगांची वाढ होऊन रोजगाराच्याही संधी निर्माण होतील.

    शेतकरी आणि त्यांच्या संस्थांना काढणीपश्चात सुविधा उभारण्यासाठी मदत करून बाजार संपर्क वाढविणे, शेतक-यांच्या निव्वळ उत्पादनात वाढ करणे ही या योजनेची उद्दिष्ट्ये आहेत. पतपुरवठ्यातील बँकांची जोखीम कमी करण्यासाठी पत हमी व व्याज सवलत या योजनेतून दिली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी, बँका व ग्राहक यांच्यात परस्परहिताचे वातावरण तयार होईल. त्याचप्रमाणे, नवनवे कृषी प्रक्रिया उद्योग उभे राहतील.

    हे घेऊ शकतात लाभ

    प्राथमिक कृषी पतसंस्था, विपणन सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, स्वयंसहायता गट, शेतकरी, संयुक्त उत्तरदायित्व गट, बहुउद्देशीय सहकारी संस्था, कृषी उद्योजक, केंद्रिय, राज्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थेने प्रस्तावित केलेले सार्वजनिक, खासगी भागीदारी प्रकल्प, कृषी उत्पन्न बाजार समिती, वखार महामंडळ, कृषी स्टार्टअप आदी यासाठी पात्र लाभार्थी आहेत.

    या योजनेत दोन कोटीपर्यंतच्या कर्जावर 3 टक्के व्याज सवलत अधिकतम 7 वर्षांपर्यंत दिली जाणार आहे. लघुउद्योगांसाठी पतहमी निधी संस्थेकडून दोन कोटी रूपयांपर्यंतच्या कर्जाला पतहमी देण्यात येणार आहे. हमी शुल्काचा भरणा केंद्र शासन करणार आहे.

    हे उद्योग उभारता येतील

    काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्पांत पुरवठा साखळी विकासाचे प्रकल्प आणि ई-मार्केट प्लॅटफॉर्म, गोदाम उभारणी, सायलो, पॅकहाऊस, गुणवत्ता निर्धार सुविधा, प्रतवारी सुविधा, शीतसाखळी, वाहतूक व्यवस्थापन सुविधा, प्राथमिक प्रक्रिया सुविधा, फळे पिकवणे सुविधा आदींची निर्मिती करता येईल. त्याचप्रमाणे, सामूहिक शेती सुविधांत सेंद्रिय निविष्ठा उत्पादन केंद्र, जैविक निविष्ठा उत्पादन केंद्र, काटेकोर शेतीसाठी सुविधा, पुरवठा साखळी सुविधा, पीपीपी तत्वावरील शासनाच्या सामूहिक शेती योजनांसाठीच्या सुविधा समाविष्ट आहेत.

    शेती, पीक काढणीमध्ये स्वयंचलन, ड्रोनखरेदी, शेतामध्ये संवेदनशील कुंपण, फार्म ॲडव्‌हायझरी सर्व्हिसेस हायड्रोफोनिक, व्हर्टिकल फार्मिंग, एरोफोनिक फार्मिंग, पॉलिहाऊस, ग्रीनहाऊस, अळिंबी लागवड यांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पाखेरीज डाळ मिल, तृणधान्याचे पीठ तयार करणे, तेलघाणी, काजू प्रक्रिया, ऊसापासून गुळ किंवा गुळ पावडर तयार करणे, कापूस जिनिंग, प्रेसिंग आदींना अपवादात्मक पात्र प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

    यासाठी अर्जदार ऑनलाईन पद्धतीने योजनेचे पोर्टल www.agriinfra.dac.gov.in वर नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतर त्यांना अधिकारपत्र मिळेल. त्यानंतर कर्जासाठीचा अर्ज पोर्टलवर सर्व कागदपत्रांसह समाविष्ट करावा.

    Tag : #कृषी क्षेत्राच्या विकासासाठी पायाभूत सुविधा योजना,#news, #कृषी #कृषी पायाभूत सुविधा #योजना
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *