• Tue. Jun 6th, 2023

उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय…..?

  उन्हाळा सुरु झाला की, शरीराची लाहीलाही होते. शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण थंड पदार्थ किंवा थंड पेयाचे सेवन करतो. आजकाल अनेकांच्या घरात फ्रिज आहे. फ्रिजमध्ये आपण अनेक पदार्थ यासह पाण्याच्या बाटल्या ठेवतो. गर्मी वाढली की, आपण फ्रिजमधील थंड पाणी पिण्यास प्राधान्य देतो. पण फ्रिजमधील थंड पाणी पिणं आरोग्यासाठी हितावाह नाही. त्याऐवजी आपण मडक्यातील पाणी पिऊ शकता.

  आयुर्वेदानुसार, मडक्यातील पाणी हे नैसर्गिकरित्या थंड असते, त्यातील पाणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तसेच असे अनेक घटक मातीत असतात, ज्यात रोगांशी लढण्याची क्षमता असते. उन्हाळ्यात मडक्याचे पाणी प्यायल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होतात(Clay Pot Vs Refrigerator, Which Water Is Healthy? ).

  * उष्णतेपासून संरक्षण…

  उन्हाळ्यात मडक्यातील थंड पाणी प्यायल्याने उष्माघातापासून बचाव होतो. वास्तविक, मडक्यातील पाणी शरीरातील खनिजे आणि ग्लुकोजची पातळी योग्य राखण्यास मदत करते. ज्यामुळे शरीराला थंडावा मिळतो, यासह उष्णतेशी संबंधित आजारांपासूनही बचाव होतो.

  * पचनसंस्था निरोगी ठेवते…

  मडक्यातील पाणी पचनसंस्थेसाठी फायदेशीर आहे. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या अल्कधर्मी असते, जे पीएच संतुलन राखण्यास मदत करतात. रोज मडक्याचे पाणी प्यायल्याने पोटातील गॅस, बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटीसारख्या पचनाच्या संबंधित समस्या दूर होतात.

  * चयापचय वाढवते…

  प्लॅस्टिकच्या भांड्यांमध्ये बीपीएसारखे घातक रसायन असते, जे आरोग्याला हानी पोहोचवते. प्लॅस्टिकच्या बाटल्यांमधील पाणी हार्मोन्समध्ये व्यत्यय आणते, ज्यामुळे चयापचय मंदावते व वजन वाढते. तर भांड्यात ठेवलेल्या पाण्यात कोणतेही हानिकारक रसायन नसतात. हे पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिज्मला चालना मिळते.

  * घशासाठी चांगले…

  फ्रिजचे पाणी प्यायल्याने घसा खवखवणे, खोकला यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. तर मडक्याचे पाणी फारसे थंड नसल्यामुळे, घशाला कोणतीही इजा होत नाही. सर्दी, खोकला आणि दम्याचा त्रास असलेल्यांनी रेफ्रिजरेटरच्या थंड पाण्याऐवजी मडक्यातील पाणी प्यावे.

  * वेदनेपासून आराम देते…

  मडक्यातील पाणी प्यायल्याने शरीरातील वेदनांची तक्रार कमी होते. चिकणमातीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, जे वेदना, पेटके आणि सूज कमी करण्यास मदत करतात. सांधेदुखीपासून आराम देण्यासाठी मडक्याचे पाणी फायदेशीर ठरू शकते.

  -कुमार चोप्रा,
  -डॉ. सुनील इनामदार.
   ————-

  टॅग्स : #water#Health Tips#पाणी #हेल्थ टिप्स
  (Source: Lokmat Health.)
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *