- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद ही पत्रकारांचे हक्क,अधिकार,समस्या,अडचणी आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी आणि त्या प्रामाणिकपणे सोडवण्यासाठी निर्माण झालेली संपूर्ण देशभरातील पत्रकारांची अत्यंत महत्त्वपूर्ण संघटना आहे असे प्रतिपादन तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विलास दादा पाटील मुंबई यांनी चिखलदरा येथे केले.
तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या वतीने चिखलदरा येथे विदर्भस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी विदर्भातून आलेल्या पत्रकारांसोबत ते अनौपचारिक चर्चा करीत होते.या निमित्ताने त्यांनी विदर्भातून आलेल्या पत्रकारांच्या समस्या आणि प्रश्न समजून घेतले आणि त्या गांभीर्याने सोडवण्यासाठी तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद निश्चितच सर्व अंगाने प्रयत्न करेल असे सर्व पत्रकारांना सांगितले.विलासदादा पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन पत्रकारांसोबत विविध विषयांवर चर्चा केली आणि पत्रकारांचे संघटन महाराष्ट्रात मजबूत करण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागात संमेलने घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्या माध्यमातून सर्व पत्रकारांना एका साखळीत जोडून सद्यस्थितीतील पत्रकारांची अवस्था, पत्रकारांवर होणारे हल्ले, पत्रकारांचे होणारे खून असे महत्त्वाचे प्रश्न हाताळण्याचा व सरकार दरबारी हे प्रश्न मांडण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे.त्यामुळे भविष्यातील वाटचालीसाठी चिखलदऱ्यातील संमेलन हे एक पर्वणी ठरणार आहे.यानंतर मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र,कोकण, खान्देश, मुंबई या विभागातही संमेलने घेण्याचा त्यांचा मानस आहे.
चिखलदऱ्यातील संमेलनाच्या यशस्वीतेसाठी त्यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानले असून पत्रकारांच्या मेहनतीमुळेच या संमेलनाला चांगला प्रतिसाद मिळाला व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांनी या संमेलनात हजेरी लावून तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेला मजबूत करण्यासाठी आम्हाला चांगली संधी दिली असे प्रतिपादन विलासदादा पाटील यांनी केले.याप्रसंगी अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीणकुमार बोके,यवतमाळ जिल्हाध्यक्ष मयुर वानखडे,अंजनगाव तालुका अध्यक्ष रवींद्र वानखडे,विवेक राऊत,राज माहोरे,उमेश काकड , सचिन अब्रूक, सुजित काठोळे,अचलपुर तालुका अध्यक्ष प्रशांत गोरले,मनोज मेळे,अमोल कंटाळे,अतुल महल्ले,विजय मालखेडे व अनेक पत्रकार उपस्थित होते.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–