Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

प्राचीनकालीन हेमाडपंथी शिव मंदिर धामंत्री

  महाशिवरात्री विशेष

  तिवसा तालुक्याला धार्मिक क्षेत्राचा वारसा लाभला असून याच तालुक्यातील नजीकच्या धामंत्री येथे प्राचीन शिव मंदिर आहे.येथे दर वर्षी महाशिवरात्रीचा भव्यदिव्य उत्सव साजरा केला जातो. या उत्सवा दरम्यान हजारो शिवभक्त शिवजीच्या चरणी श्रद्धेने माथा टेकण्यासाठी येतात.

  नजीकच्या धामंत्री येथील शिव मंदिर हे प्राचीनकालीन हेमाडपंथी मंदिर असून द्वापार युगात या मंदिराची निर्मिती केल्याचा कयास आहे. मंदिरातील घंटा सर्व दूर प्रसिद्ध आहे.१९७४ ला पंजाबराव ढेपे यांनी देणगी स्वरूपात हा घंटा दान दिला आहे. चार क्विंटल दहा शेर वजनाचा असलेला हा घंटा पूर्णपणे अष्टधातूचा आहे.नव्याने मंदिराचा जीर्णोद्धार /सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. श्री नागेश्वर महाराजांनी १९७४ ला या मंदिराचे बांधकाम केले आहे.सदर बांधकाम हे पाषाण व गारगोटीचे(दगडाचे) कोरीव स्वरूपातील आहे.मंदिरासभोवती मंदिराच्या भिंतीवर अनेक देवी-देवतांच्या मूर्ती दिसून येते. दर्शनी भागांमध्ये दीड फूट उंच व दोन फूट रुंदीचे नंदीबैलाच्या पाषाणाची मूर्ती आहे.तसेच पिंड बांधण्यात आली आहे.

  प्राचीन काळात सहा महिन्याची रात्र व सहा महिन्याचा दिवस असे.राक्षसाकडून होणारा उपद्रव याचा सामना करण्यासाठी तसेच स्वतःच्या रक्षणासाठी ऋषीमुनींनी शिवजीना आराधना करण्यासाठी एका रात्रीत या मंदिराचे बांधकाम केले आहे अशी आख्यायिका आहे.तसेच येथे विठ्ठल रुख्मिणी चा अभिषेक होत असल्याचे शिव भक्तांनी सांगितले.

  प्राचीन कालिन महत्त्व असलेल्या या ठिकाणी श्रावण मास,दत्त जयंती,श्री महाशिवरात्री महोत्सव असें तीन प्रमुख उत्सव साजरे केले जातात.यात महाशिवरात्री उत्सव हा सर्वात मोठा उत्सव असतो.या महोत्सवामध्ये हजारो शिवभक्त हजेरी लावतात. प्राचीन कालीन महत्त्व असलेल्या या हेमाडपंथी मंदिराला महाराष्ट्र शासनाचा "क" दर्जा प्राप्त असून सध्या या मंदिराचे व्यवस्थापन नागेश्वर महादेव संस्थान ट्रस्ट धामंत्री चे द्वारा विश्वस्त विजय करडे आणि कैलास कुमार पनपालिया पाहतात.

  -प्रा.डॉ.नरेश इंगळे
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code