Recent in Technology

Advertisement

Breaking News

त्यागमुर्ती माता रमाई

रमाई राजगृहाची सावली,
समाजाची झाली माऊली,
फाटक्या संसारात सुखी,
रमाईची त्यागमुर्ती पाहिली ||१||

रोज जळत होती दु:खाच्या अग्नीत,
सुख भोगण्याचा हट्ट केला नाही,
दु:ख सोसत राहिली लेकरासाठी,
श्वास भिमाचा,ध्यास समाजाचा पाही ||२||

शेणी गोवऱ्या त्या थापुनी,
पै, पैसा तो कमवुनी साठवी,
भिमा साठी परदेशात ती,
शिक्षणासाठी पैसा पाठवी ||३||

लेकरे आश्रमातील राहिली उपाशी,
कळले रमाईस भरुनी आले मन,
दिल्या बांगड्या काढुनी सोन्याच्या,
अन्न घातले खाऊ तृप्त केले जन ||४||

रमाई तुझ्या भाली  कुंकवाला,
भिमा सुर्याचं आहे सारं तेज,
त्या तेजानं उजळय जग हे,
सारं सोनियाचं हे आज ||५||

धन्य धन्य तू माता रमाई,
तुझी गौरव गाथा लिही,
आज त्याग तुझा देई ,
ह्या इतिहासाची ग्वाही ||६||

  ‌               -प्रविण खोलंबे.
 ‌                  ता.मुरबाड,जि.ठाणे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code