Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

धीरज रामभाऊ लिंगाडे सर्वाधिक मते मिळवून विजयी

  * अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या मतमोजणीत सर्वाधिक 46 हजार 344 मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे विजयी उमेदवार ठरले.

  निवडणूक निरीक्षक पंकज कुमार, निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत श्री. लिंगाडे यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या सुविद्य पत्नी पद्मजा, मुलगा सोहम आणि वेदांत उपस्थित होते.

  निवडणूकीत झालेल्या 1 लाख 2 हजार 587 मतदानापैकी 93 हजार 852 एवढी मते वैध व 8 हजार 735 मते अवैध ठरली. अवैध ठरलेल्या 8 हजार 735 मतांचे फेरअवलोकन करण्याची मागणी उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार या मतांची फेरमोजणी करण्यात आली. यापैकी 348 मते वैध मानण्यात आली. त्यानुसार एकूण वैध मते 94 हजार 200 ही संख्या निश्चित होऊन 8 हजार 387 मते अवैध ठरली. विजयासाठी 47 हजार 101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

  मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेत श्री. लिंगाडे यांना सर्वाधिक 43 हजार 517 मते मिळाली. डॉ. पाटील यांना 41 हजार 171 मते मिळाली. अनिल ओंकार अमलकार (4 हजार 188), डॉ. गौरव आर. गवई (241), अनिल वकटूजी ठवरे (26), अनंतराव राघवजी चौधरी (79), अरुण रामराव सरनाईक (1 हजार 542), ॲड. आनंद रवींद्र राठोड (383), धनराज किसनराव शेंडे (23), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (69), निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), पाटील उपेंद्र बाबाराव (66), पाटील झांबरे शरद प्रभाकर (421), प्रजापती श्याम जनमोहन (208), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1 हजार 695), प्रवीण दिगांबर बोंद्रे (45), भारती दाभाडे (216), माधुरी अरुणराव डाहारे (93), रणवीर संदेश गौतमराव (43), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), विकेश गोकुलराव गवाले (51), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), संदीप बाबुलाल मेश्राम (70)

  प्रथम पसंतीक्रमाच्या गणनेनंतरही कोटा पूर्ण होत नसल्याने बाद फेरी सुरू होऊन त्या फे-यांत सर्वात कमी मते मिळाल्याने बाद होणा-या उमेदवारांची दुस-या पसंतीक्रमाच्या मतांची गणना झाली. या गणनेदरम्यान निलेश दिपकपंत पवार (राजे), लक्ष्मीकांत नारायण तडसे, धनराज किसनराव शेंडे, सुहास विठ्ठलराव ठाकरे, अनिल वकटुजी ठवरे, रणवीर संदेश गौतमराव, प्रविण डिगांबर बोंद्रे, विकेश गोकुलराव गवाले, पाटील उपेंद्र बाबाराव, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, संदीप बाबुलाल मेश्राम, अनंतराव राघवजी चौधरी, माधुरी अरुणराव डाहारे, प्रजापती श्याम जगमोहन, डॉ. गौरव आर गवई, श्रीमती भारती ख. दाभाडे, ॲड. आनंद रविंद्र राठोड, शरद प्रभाकर झांबरे पाटील, अरूण सरनाईक, डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी, अनिल ओंकार अमलकार हे उमेदवार त्यांच्या कमी मतसंख्येनुसार क्रमाक्रमाने बाद ठरविण्यात आले.

  त्यानंतर उर्वरित दोन उमेदवारामध्ये प्रथम क्रमांकाची सर्वाधिक 46 हजार 344 मते श्री. लिंगाडे यांना व दुस-या क्रमांकाची 42 हजार 962 मते डॉ. पाटील यांना मिळाली. त्यानुसार श्री. लिंगाडे यांना 3 हजार 382 ही अधिकची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

  अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक मतमोजणीला बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे काल दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू झाली. तब्बल 34 तास ही प्रक्रिया चालली. निवडणुकीत 265 टपाली मतपत्रिकांपैकी प्रतिज्ञापत्र नसणे, सही, साक्षांकन, सीलबंद पाकिटात नसणे आदींमुळे 73 मतपत्रिका रद्द करण्यात आल्या.

  अन्य उमेदवारांची मते खालीलप्रमाणे -

  निलेश दीपकपंत पवार (राजे) (14), लक्ष्मीकांत नारायण तडसे (14), धनराज किसनराव शेंडे (23), सुहास विठ्ठलराव ठाकरे (25), अनिल वकटूजी ठवरे (26), रणवीर संदेश गौतमराव (44), प्रवीण दिगांबर बोंद्रे (46), विकेश गोकुलराव गवाले (52), पाटील उपेंद्र बाबाराव (70), ॲड. धनंजय मोहनराव तोटे (73), संदीप बाबुलाल मेश्राम (76), अनंतराव राघवजी चौधरी (80), माधुरी अरुणराव डाहारे (108), प्रजापती श्याम जनमोहन (212), डॉ. गौरव आर. गवई (246), भारती ख दाभाडे (252), ॲड. आनंद रवींद्र राठोड (402), पाटील झांबरे शरद प्रभाकर (462), अरुण रामराव सरनाईक (1596), डॉ. प्रवीण रामभाऊ चौधरी (1774), अनिल ओंकार अमलकार (4338).

  मतमोजणीचे कार्य करत असताना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवनी येथील मंडल अधिकारी एस. सी. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिवंगत खडसे यांना निवडणूक प्रशासन व अधिकारी- कर्मचा-यांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

● हे वाचा - संविधानात धार्मिक स्वातंत्र्याचा अन्वयार्थ
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code