Header Ads Widget

सुकन्या योजनेत खाते उघडून कन्येचे भविष्य सुरक्षित करावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

  अमरावती ‘संपूर्ण सुकन्या जिल्हा’ करण्यासाठी मोहिम
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : पोस्ट विभागामार्फत ‘अमरावती जिल्हा संपूर्ण सुकन्या जिल्हा’ हा उपक्रम जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत राबविण्यात येत असून, त्यात 0 ते 10 वयोगटातील मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या कन्येचे नाव या मोहिमेत नोंदवून तिचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी पाऊल उचलावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले.

  ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ उपक्रमाचा भाग म्हणून मुलींचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी, तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी सुकन्या समृद्धी योजना राबवली जात आहे. या योजनेचे सध्याचे व्याज दर 7.6 टक्के प्रतिवर्ष एवढे असून या योजनेतील बचत रकमेवर प्राप्तीकरात सवलत दिली जाते.

  पालक आपल्या मुलीच्या नावे जवळच्या पोस्ट कार्यालयात किमान 250 रूपये भरून खाते उघडू शकतात. योजनेत 50 रू. च्या पटीमध्ये एका आर्थिक वर्षात कमाल दीड लाख रूपये जमा करता येतात. सुकन्या खाते काढण्यासाठी मुलीचा जन्माचा दाखला, पालकाचे ओळख व रहिवाशी पुरावे जसे आधार कार्ड, पॅन कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी लागतात. जिल्ह्यातील दहा वर्षांखालील प्रत्येक मुलीचा या योजनेत समावेश व्हावा. पालकांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या कन्येचे नाव नोंदवून खाते सुरू करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.

  या मोहिमेत आपल्या मुलीचे खाते काढण्यासाठी नजिकच्या पोस्ट ऑफिसशी किंवा आपल्या पोस्ट्मनशी संपर्क साधावा. योजनेच्या अधिक माहितीसाठी 9112234354 या व्हाटस ॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रवर अधीक्षक डाकघर डॉ. वसुंधरा गुल्हाने यांनी केले.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या