Header Ads Widget

तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या..!

  १. तणाव का निर्माण झाला ते जाणून घ्या. त्यानंतर त्यापासून मुक्ती कशी मिळवता येईल, याचा विचार करा.
  २. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आपल्या ताकदीबाहेरचे काम करू नका. त्यामुळे उगाचाच न्यूनगंड निर्माण होऊन तणाव वाढतो.
  ३. जास्त शत्रू निर्माण करू नका. जय-पराजयाच्या भावना फार तीव्र नकोत.
  ४. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या.
  ५. आपल्या गरजा कमी करा.
  ६. आकस्मिक घडणार्‍या घटनांकडे शांत चित्ताने पहा.
  ७. आधी आपल्याला काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.
  ८. नेहमी सकारात्मक विचार करा. नकारात्मक विचारांना कायम दूर ठेवा.
  ९. आपण सतत चिडत तर नाही ना? हे पहा. मग त्यानुसार तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा.
  १०. आधी आपल्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये लक्षात घ्या. त्यानुसार तणाव कमी करा.
  ११. आपल्या मनाला सल्ला द्या. समजवा. एखादी स्थिती तुमच्यामुळे उत्पन्न झाली की दुसर्‍यांमुळे ते नक्की करा. ती स्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी शांततापूर्वक विचार करा.
  १२. दुसर्‍यांना एका विशिष्ट्य मर्यादेपर्यंत आपण बदलू शकतो. त्यानंतर नाही. त्यामुळे त्याच्या भावनांना समजून घ्या.
  १३. पुढच्याच ठेच मागचा शहाणा. या म्हणीतून काही शिका. मागचे अनुभव पुढच्या वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
  १४. तणावासंदर्भात तुमचे जवळचे मित्र, नातेवाईक यांच्याशी चर्चा करा. चर्चेने तणाव हलका होतो.
  १५. रासायनिकदृष्ट्यासुद्धा तणाव वाढतो. उदा. कॅफीन जास्त पोटात गेल्यास विशिष्ट्य हार्मोन्स वाढतात व तणावही वाढतो.
  १६. नियमित व्यायाम, योग, फिरणे, पोहणे, नृत्य यामुळे शरीर सैलावते. तणाव कमी होतो.
  १७. नियमित ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो.
  १८. दिवसभरात सतत काम न करतात थोडी विश्रांतीही घ्यावी. शांतपणे बसून दीर्घ श्वास घ्या व तो हळूहळू सोडा.
  १९. आपली एक दिनचर्या बनवा. प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ठ वेळ द्या.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
  * नियंत्रण ठेवा
  १) ज्या गोष्टीवर तुमचे नियंत्रण नाही त्या गोष्टीचा विचार करणे सोडून द्या.
  २) स्वतःला busy ठेवा म्हणजे व्यस्त ठेवा.
  ३) तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या.
  ४) ध्यान करा, मेडीटेशन करा.
  ५) कोणावरही कोणत्याही गोष्टीसाठी अवलंबून राहू नका.
  डाॅ. सुजय पाटील
  एम.बी.बी.एस.डी.पी एम.
  मानसोपचार तज्ञ,अकोला
  मो.९८ ५० ८१ ०३ १९.
  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या