- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : माता रमाबाई आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रसिद्ध साहित्यिक, वक्ता डॉ.प्रतिभा जाधव लिखित ‘महामाता रमाई’ ह्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन नुकतेच नाशिक येथे संपन्न झाले. उत्तम नगर येथे रमाई जयंतीच्या भव्य सोहळ्यात सुप्रसिद्ध गीतकार पी.कुमार धनविजय यांचे हस्ते तसेच युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद बनसोडे, चित्रपट दिग्दर्शक निलेश आंबेडकर, वैशाली प्रकाशनचे विलास पोतदार,राजू जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
संयमी, सोशिक, काटकसरी, कष्टाळू, औदार्य, दूरदृष्टी असणाऱ्या प्रेमळ, मितभाषी, स्वाभिमानी, करड्या शिस्तीच्या महामाता रमाईचा खडतर तेवढाच प्रेरक असा प्रवास सदर ग्रंथात डॉ.प्रतिभा जाधव यांनी उलगडून दाखवला आहे. सदर ग्रंथ वैशाली प्रकाशन,पुणे यांनी प्रकाशित केला आहे.
‘महामाता रमाई’ ह्या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ.प्रतिभा जाधव यांच्या साहित्यकृतींची दशकपूर्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी ललित, वैचारिक, कविता, नाटक ह्या साहित्यप्रकारांत लेखन केलेले असून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक मानाचे पुरस्कारही आजपर्यंत त्यांना प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या काव्यसंग्रहाचा हिंदी व इंग्रजी अनुवादही प्रकाशित आहे.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–