- * या सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
- * तहसील कार्यालयात सुविधा सुरू
- गौरव प्रकाशन वृत्त संकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शेतकरी तसेच नागरिकांना ऑनलाईन सात-बारा तसेच तत्सम सुविधांसाठी आता शासकीय तसेच तलाठी कार्यालयात वेळ खर्च करण्याची गरज नाही. केवळ मशिनच्या एका क्लिकवर ऑनलाईन स्वरुपातला सात-बारा तसेच अन्य सुविधा सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑनलाईन सात-बारा प्राप्त होणाऱ्या मशिनचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके, उपजिल्हाधिकारी रणजीत भोसले, अतिरिक्त जिल्हा सूचना अधिकारी मनिष फुलझेले, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक प्रफुल्ल मेहेर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन
यावेळी श्रीमती कौर म्हणाल्या, शेतकरी तसेच नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळावा तसेच आवश्यक कागदपत्रांसाठी त्यांचा वेळ वाया जाऊ नये, यासाठी अद्ययावत माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यात पारदर्शकता व गती निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या माध्यमातून शासकीय कामकाजामध्ये जलद, वस्तूनिष्ठ व पारदर्शकतेसाठी सात-बारा मशिन मदतनीस ठरणार आहे. यामध्ये जुने सात-बारा, कोतवाल बुक, गाव नमुना आठ-अ, पेरे पत्रक, नोंदणी, जुने फेरफार तसेच ऑनलाईन सात-बारा या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या सुविधेंतर्गत शासकीय नोंदणीकक्षातील सर्व कागदपत्रे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन ऑनलाईन करण्यात आली असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
ऑनलाईन सात-बारा मशिन अंतर्गत प्रत्येक सुविधेसाठी केवळ तीस रुपयांचा खर्च येणार आहे. ही मशिन वापरणे शेतकरी तसेच नागरिकांना सहज शक्य आहे. या मशिनमध्ये सर्वांना समजेल अशा सोप्या भाषेत सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये जी सुविधा हवी असेल, ती निवडून आवश्यक ते कागदपत्रे त्वरित प्राप्त करता येईल. मशिनच्या स्क्रीनवर सर्वप्रथम जिल्हा निवड करुन त्यामध्ये तालुका, गावाचे नाव, आवश्यक असलेल्या कागदपत्राचे नाव, सुविधेचे नाव निवडून शुल्क अदा करावे. त्यानंतर त्या कागदपत्राची प्रिंटआऊट प्राप्त होईल. नागरिकांना या यंत्रणेचा वापर करताना मार्गदर्शन मिळण्यासाठी ही मशिन अमरावती तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात येत आहे. तेथील संबंधित कर्मचारी याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करणार आहे. सात-बारा डिजीटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही, शिक्क्याची गरज नाही, असे श्री. भोसले यांनी सांगितले.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–