• Mon. May 29th, 2023

व्हॅलेंटाईन डे

    आज तरुणाई अगदी भटकल्यासारखी दिसते. त्यांना दिशा माहीत नसल्याने ती मंडळी या तरुणाईत तरुणाईला सर्वस्व मानून हवी तशी वागत असते. त्यामुळे तरुणाईत ही मंडळी नेहमीच फसतात. पुर्वी हॅलेंटाईनचा दिवस म्हणजे प्रेमाचा दिवस म्हणून लोकं साजरा करायचे. भारतात ही प्रथा नव्हती. ती इंग्रजांपासून आली. हा दिवस साजरा करतांना तरुण तरुणीला लाल गुलाब बक्षीस द्यायचा. त्यानंतर तीही राग न मानता तो गुलाब स्विकार करायची आणि आपल्या केसात माळायची. प्रेमाचा इजहार करण्याचा तो प्रकार…..हॅलेंटाईन डे म्हणून प्रसिद्ध झाला.

    आज व्हँलेंटाईन डे लोकांच्या मनामनात शिरला आहे. लहानगी मुलेही व्हॅलेंटाईन डेला आपल्या लहानशा प्रेयसीला फुल देतात. हसतात. ती हसली की समजायचं तिनं प्रेमाचा स्विकार केला. असा हा डे सर्वानाच प्रिय ठरत आहे. पण व्हॅलेंटाईन साजरा करतांना थोडा विचार नक्कीच करावा.

    व्हॅलेंटाईन हा सैनिक होता. तो रोमला राहात होता. तसेच त्यावेळी तिथे क्वाँडीयस दुसरा नावाचा राजा राज्य करीत होता. त्याच्या राज्यात फतवा होता की सैनिकाने कोणत्याच मुलीवर प्रेम करु नये किंवा अविवाहित पुरुषच उत्तम सैनिक बनु शकतात. म्हणून तरुणांनी विवाह करुच नये. प्रेमही करु नये. जर प्रेम केलेच तर त्याला मृत्यूदंड दिला जाईल. पण व्हॅलेंटाईन याने या तरुणांचे लपुनछपून विवाह करणे सुरु केल्याने माहीत होताच राजाने त्याला तुरुंगात टाकले. पण तिथेही व्हॅलेंटाईन चुप बसला नाही. तिथे जेकोबस नावाच्या तुरुंगाधिरा-याच्या मुलीवर तो प्रेम करु लागला. ती आंधळी होती. पण तरीही प्रेमाला त्या राज्यात थारा नसल्याने त्याला राज्याने मृत्युदंड दिला. पण त्यानंतर लोकं स्वस्थ बसले नाहीत तर त्यांनी व्हॅलेंटाईनचा पुतळा उभा करुन त्या पुतळ्यासमोर ते प्रेमविवाह करु लागले. हा व्हॅलेंटाईन नावाचा माणूस त्यांच्यासाठी वरदान ठरला.

    विदेशात हा उत्सव सात दिवस चालतो. रोज डे, प्रपोज डे, चाकलेट डे, टेडी डे, प्रामीश डे, हग डे, किस डे आणि सर्वात शेवटी व्हॅलेंटाईन डे. या दिवशी चांगले स्वच्छ कपडे तरुण तरुणी परिधान करुन एकमेकांना भेटायला येतात. काही फक्त प्रेमाचं प्रतिक म्हणून गुलाब देतात. नंतर नाश्ता चारुन प्रेयसीला मोकळे करतात. हे तेवढं बरोबर आहे. पण काही याही पलिकडचे आहेत. ते मात्र प्रेयसीला चांगले कपडे परिधान करायला लावतात. भेटायला बोलावतात. मग दोनचार गर्भनिरोधक गोळ्या खिशात टाकतात. जसे की ते हनीमुनलाच चालले. हो, त्यांचं ते हनीमुनच असतं. प्रेयसीलाही ते मंजूरच असतं. मग जेव्हा ते भेटतात. तेव्हा चक्क बाईकवर स्वार होत त्यांची परियंती मोठ्या उच्चभ्रु हाॅटेलात होते. यात ते आपल्या सा-या तरुणपणाच्या इच्छा व्हॅलेंटाईनच्या रुपाने साज-या करतात. परत सायंकाळी मायबाप ओरडायला नको म्हणून घरी येतात. मायबापांनाही माहीत नसतं की मुलगी व्होलेंटाईनला फिरायला कोणाबरोबर गेली वा व्हॅलेंटाईन डे म्हणजे कोणता डे? या दिवशी काय करायचं असतं? यातच कधीकधी गर्भनिरोधक गोळ्या काम करीत नाही आणि गर्भ राहतो. मग ज्याचा गर्भ राहतो तो मुलगा नकार देत तिच्यापासून दूर निघून जातो. तो एवढा दूर निघून जातो की त्या गर्भाच्या गर्भपातापर्यंतच्या वेदना फक्त त्या तरुणीलाच झेलाव्या लागतात.

    महत्वाचं म्हणजे व्हँलेंटाईन नावाचा संत. त्याने प्रेमींना प्रेम करायचा संदेश अवश्य दिला आहे हे मानणे ठीक आहे. पण त्याने लग्नापुर्वीच आपल्या प्रेमाच्या नशेत आपल्या कामवासना पुर्ण करा हा संदेश दिलेला नाही. तरीही आम्ही असे का वागतो? हे कळत नाही. आजचा युवक प्रेमाच्या नावावर प्रेयसीला जलवा दाखवतांना रंगीबेरंगी बाईक घेतात. त्यांचे वेगवेगळे स्टंट प्रेयसी प्रसन्न व्हावी म्हणून दाखवितात नव्हे तर प्रेयसीला गाडीवर बसवून गाड्या भरधाव वेगाने चालवतात. त्यातच प्रेयसी गाडीवरुन केव्हा खाली पडते? केव्हा त्याचा अपघात होतो? हे देखील त्याला समजत नाही. त्यातच काही तरुण याहीपलिकडचे……ते तर प्रेयसीला चांगलं वाटावं म्हणून तिच्या समोरच सिगारेटचे झुरके घेतात. पण त्यापासून पुढे आपल्यालाच यापासून कँन्सर होईल याची त्यांना जाणीव वा तमा नसते.

    विशेषतः आमची भारतीय संस्कृती एवढी महान असतांना आम्ही या विदेशी संस्कृतीच्या फंदात पडून त्यांच्याही संस्कृतीला बदनाम करण्याची गरज नाही. निव्वळ आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी आम्ही व्हॅलेंटाईन मानतो. खरं तर प्रेम करतांना त्याला काळ, वेळ, स्थळ याची आवश्यकता नसते. ते प्रेम केव्हाही होते. त्यासाठी व्हॅलेंटाईन डे ची आवश्यकता नाही. तसा पुर्वी भारतात व्हॅलेंटाईनचा गंधही नसतांना प्रेम झाले नाही काय? क्रिष्ण राधेचं प्रेम, मीरा क्रिष्णाचं प्रेम, जोधा अकबरचं प्रेम, सलीम नूरजहाँचं प्रेम……ह्या प्रेमकथा भारतातच घडल्या ना. तरीही आम्ही आजही नाद करीत व्हॅलेंटाईन डे साजरा करतो.

    आपली संस्कृती विसरतो आणि मग फसतो. मुळात व्हॅलेंटाईन डे जर तुम्ही पाळता आहात तर एक लक्षात ठेवा. या व्हॅलेंटाईनने नियमाला अव्हेरुन प्रेमविरांचं लपुनछपून लग्न लावलं एवढंच नाही तर आंधळ्या जेकोबसशी प्रेम केलं. पण आजच्या तरुणांना सुंदर मुलगी हवी. आंधळी नको.दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आजचा धंदेवालेही याच दिवसाचा फायदा घेवून गुलाबाच्या फुलाची किंमत वाढवतात. तसेच नाश्तादुकान, लाज, यांचेही दर वाढलेले असतात. ते लुटलुट लुटतात या प्रेमविरांना. महत्वाची गोष्ट अशी की हा दिवस याच दिवशी व्हॅलेंटाईन दिवस आहे की लुटमार दिवस आहे ते कळत नाही. तरीही आम्ही साजरा करतो. हॅलेंटाईन डे हे सर्व विसरुन. मुलीही दिमाखानं प्रेमविरांना भेटायला जातात आणि त्यांच्या जाळ्यात फसून आपलं अवसान गाळून बसतात. हे काही बरोबर नाही. जी फुले देवाला चढायला हवी. ती फुले अनैतिक कृत्य करणा-या मुलामुलींच्या हातात असतात नव्हे तर त्यातून धोके मिळताच त्यांच्या शवावर. १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईनचा स्मृतीदिन अवश्य साजरा करा. पण एक लक्षातही असू द्या. आम्ही भारतीय आहो. आमची संस्कृतीही भारतीय आहे. ज्या संस्कृतीत लग्नापुर्वी कामवासनेला जागा नाही.

    -अंकुश शिंगाडे
    ९३७३३५९४५०
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *