• Fri. Jun 9th, 2023

महाशिवरात्री निमीत्याने

  उद्या महाशिवरात्र. भगवान शंकराचा दिवस. भगवान शंकर हेही एक दुःखी पात्र. सृष्टीनिर्माते म्हणून ब्रम्हा, पालनकर्ते म्हणून विष्णू, तर समाप्त करणारा घटक म्हणून या शिवाला मानलं जातं. या शिवाला मानतांना सर्वप्रथम बेल वाहावं म्हणतात. त्या बेलानं शिव प्रसन्न होतो म्हणतात. महत्वाचे म्हणजे भगवान शंकर आदिवासींचा राजा. रोज द-याखो-यात राहून कंदमुळे खाणारा माणुस. हा माणुस कुठेतरी त्या तमाम लोकांना त्यावेळी भारी गेला. ज्यांची राजसत्ता होती. म्हणून त्या राजसत्तेने या आदिवासी माणसाचे अस्तित्व मान्य केले. त्याच्यात तद्नंतर चमत्कार ही भरला. हे वास्तविक सत्य आहे. पुराणात एक कथा आहे की एक शिकारी एका झाडावर बसून हरणाची शिकार करण्याची वाट पाहात होता. ते झाड बेलाचे होते. मात्र वाट पाहता पाहता तो त्या बेलाचे एक एक पान तोडून खाली टाकु लागला. तेव्हा ते बेलाचे पान खाली असलेल्या पिंडीवर पडु लागले. क्षणात त्याचा स्वभाव बदलला. त्याची शिकारीची भावना नष्ट झाली. असं होत नाही. पण पुस्तकात तसंच लिहिलंय.

  दरवर्षी लोक महाशिवरात्रीला यात्रेला जातात. पचमढीला यात्रेला जात असतांना हे पचमढी म्हणजे भाविकांना अमरनाथच वाटते. एवढे प्रेम लोकं त्या पचमढीवर करतात. ज्यांच्याकडे पैसा नाही ते मात्र जवळपासच्या मंदीरात जातात. हरबोला हरहर महादेव म्हणत हे त्या टेकड्या चढत असतात. त्या टेकड्या चढतांना फार मजा वाटते. विशेष म्हणजे ह्या टेकड्या चढत असतांना महत्वाचा फायदाही होतो. अंगाची सर्वीसींग झाल्यागत वाटते.

  सा-या बिमारीचं धन असलेलं शरीर रक्तात कोलेस्टेराल साठल्यानं मोठमोठे आजार होत असतात. ही कोलेस्टेरालची समस्या रक्त घट्ट झाल्यानं होत असते. तेव्हा ते रक्त पातळ होण्यासाठी या भगवान शंकराची एकप्रकारे मदतच होते. कशी तर भगवान शंकर टेकडीवर वास करतात. अर्थात त्यांचं मंदीर टेकडीवर असते. या मंदीरावर जातांना चढाव चढावा लागतो. तो चढाव चढत असतांना रक्त हे धमणीतुन सळसळ वेगाने धावत असते. कोलेस्टेराल च्या भागाला साफ करत…. त्यामुळे एकंदर यामुळे फायदाच होतो शरीराला.

  भगवान शंकराची भक्ती करतांना कोणी ध्यान लावतात. त्यामुळे एकाग्रता वाढीस लागते. स्वभाव शांत होतो. तिथे फोडण्यासाठी वापरले गेलेले नारळ त्याचे खोबरे खावुन शरीराला कॅल्सीअम मिळत असते. पर्यायाने भाविकांना वाटो न् वाटो पण यामुळे रक्त पातळ झाल्याने मनात चैतन्य निर्माण होते. माणूस पुढील कामे सापाचे कात टाकल्यागत करीत असतो.

  भगवान शंकराकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. त्यांचे महाविराट रुप पाहून त्यागाची भावना वाढीस लागते. त्यांच्या शरीरावर वस्रे नव्हती. त्यावरुन त्याग परोपकारी वृत्ती दिसून येते. एवढेच नाही तर भगवान शिवाने पुर्ण सृष्टीला केंद्रीत केलेला फोटो हा मुळात संदेश देतो की माणसाने राग, लोभ, द्वेष,मध, मत्सर यापासून दूर राहावे.

  महत्वाचे सांगायचे झाल्यास कोणी भक्त मानो या न् मानो, भगवान शंकराची पुजा केल्याने अंगातील सारेच षडरिपु जे शरीराचे दुश्मन असतात. ते दूर भागवायला मदतच होते.मानवाच्या शरीरात बरेच शत्रु असतात. ते शत्रु मानसाच्या आयुष्याला नष्ट करीत असतात. तेव्हा हे शत्रु शांत करण्यापुर्वी आपण शांत होणे गरजेचे आहे. भगवान शंकराने दक्षाला ठार तर केले पण त्यांनी आपला क्रोध शांत करण्यासाठी कैलासावर तपश्चर्या केली. त्यांनी समुद्र मंथनातुन निघालेले विष ग्रहण केले. त्यांनी चंद्राला डोक्यावर ठेवुन त्याच्या वासनांध शक्तीला नियंत्रीत केले. तसेच स्वर्गातुन आलेल्या गंगेलाही त्यांनी जटेमध्ये सामावुन घेतले. संजीवन विद्येचा वापर करुन त्यांनी स्वपुत्राला जीवंत केले. त्यांचा वैराग्यपणा हा खरंच वाखाणण्याजोगा आहे. ते भाविक असो की नसो प्रत्येकासाठी ते वरदान आहेत. कारण त्यांच्या स्थळाला भेट देण्यासाठी डोंगर चढुन जावे लागते. त्यामुळे कित्येक आजारापासुन दिलासा मिळू शकतो. यात आतिशयोक्ती नाही.

  बरोबर आहे. मी आध्यात्म मांडलेलं नाही. शंकर हा आदिवासी बहुजन समाजाचा देव. डोंगरद-यात राहणारा. म्हणून खाली लिहिलं की त्यांच्याकडे आध्यात्म म्हणून पाहू नका तर एक व्याधी नष्ट करण्याचा पर्याय म्हणून पाहावे. कारण डोंगर चढून रक्ताच्या वाहण्यात जो वेग निर्माण होतो तो अनेक व्याधींना नष्ट करतो. हे तेवढंच खरं आहे.

  अंकुश शिंगाडे
  नागपुर
  ९३७३३५८४५०
  ————–

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  ——————–

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *