• Wed. Sep 27th, 2023

बंध

  तुटलेले बंध
  डोळ्यातील आसू
  शांत करु शकत नाहीत
  मनातला दाह
  विखरलेले सागर
  रात्रदिन यत्न करूनही
  विखरलेली रेषा
  मिटवू शकत नाहीत
  ऋणानुबंधाला तडे जातांना
  तटतट तुटत राहतात
  एक एक अनुबंध
   न जुळण्यासाठीच
   चेहरे शोधत राहतात
   आपलेपणाची ऊब
   आसू लाव्हा होऊन
   दगडीशीळा होतात
   सुकलेके रिते झरे
   ओल धरत नाहीत
   आठवाचे उमाळे
   राख ओघळत राहतात
   शल्य शुल होऊन
   टोकरत राहतो काळीज
   आंधळ्या जनक्षोबास
   दिसतो हिरवा गासचारा
   एक रेषा आपण
   मिटवत राहतो आयुष्यभर
   तरीही ती मिटत नाही
   नुसती तडफड तडफड
   भडकलेली आगही
   विझते पाण्याने
   मनातली आग भिजवण्या
   मी शोधत राहातो पाणी !!
   शेवट अप्रतिम
   मुबारक उमराणी
   सांगली
   ९७६६०८१०९७.
   ————–

   तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

   Thank you for reading this post, don't forget to subscribe!

   ——————–

   आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

   -बंडूकुमार धवणे
   संपादक गौरव प्रकाशन
   ——————–

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,