- जीवनाच्या काही प्रसंगाने
- रडता रडता हसवणं शिकविलं
- काही क्षणभराच्या आनंदाने
- हसता हसता रडवणं शिकविलं
- हसत्या रडवत्या जीवनाने
- मला परिस्थितीशी लढायला शिकविलं
- लढता लढता स्वआसवाने
- या दुनियात जगायला शिकविलं
- स्नेही प्रेमी स्वभावाने
- ह्रदयात घर करायला शिकविलं
- आपल्या पवित्र आचरणाने
- मनपटलावर प्रतिमा कोरायला शिकविलं
- कितीही आपुलकीने जपल्याने
- कुणीच कुणाचं नसल्याचं शिकविलं
- स्वत:च स्वत:वरच्या विश्वासाने
- जीवनाची नाव हाकण्याचं शिकविलं
- शब्द शब्दाच्या गुंफनाने
- कविताशी नाळ जोडायला शिकविलं
- कविताच्या सुमधूर सहवासाने
- अनेकाअनेक धडे गिरवायला शिकविलं
- आई-वडिलांच्या संस्काराने
- जगी नाव कमवायला शिकविलं
- म्हणूनच सुनीलच्या लेखनीने
- साहित्यक्षेत्रात ठसा उमटवायला शिकविलं
- शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
- कमळवेल्ली, यवतमाळ
- भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
● हे वाचा – आयुष्याच्या वाटेवर,अनुभव संपन्न कविता संग्रह
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–