मोर्शी (तालुका प्रतिनिधी): महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३६ व्या पदवीदान समारंभ कार्यक्रमात डॉ अमृता ज्ञानेश्वर राऊत या मुलीने phd मध्ये विद्यापीठातून प्रथम क्रमांक प्राप्त गोल्ड मेडल मिळविल्यामुळे सर्व स्तरावरून अमृताचे अभिनंदन करण्यात येत आहे.
जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही कामात अपयश येत नाही हे, वरूड तालुक्यातील सावंगा येथील ज्ञानेश्वरराव राऊत व मायाताई ज्ञा. राऊत यांची मुलगी डॉ. अमृता ज्ञानेश्वरराव राउत या जिद्दी मुलीने दाखवून दिले आहे. त्यांची परिस्थिती हालाखीची असताना सुद्धा डॉ. अमृता राऊत हिने मेहनत घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठातून Phd मध्ये प्रथम क्रमांक आणि गोल्ड मेडल प्राप्त करून विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.
डॉ अमृता राऊत हिने जिल्हा परिषद शाळा सावंगा येथे ५ वी पर्यंत, आर सी हायस्कूल लोणी येथे ६ वी ते १० वी, उत्क्रांती ज्युनिअर कॉलेज जरुड येथे ११ वी ते १२ वी (सायन्स) पूर्ण करून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, येथे BSc. Agri पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे MSC आणि Ph.D ही मृदविज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात महात्मा फुले कृषी विद्यापीठातून Phd पूर्ण केली.
डॉ अमृता ज्ञानेश्वर राऊत या मुलीने phd मध्ये विद्यापीठातून प्रथम आणि गोल्ड मेडल प्राप्त केल्याबद्दल कृषिमंत्री अब्दुल सत्तार, राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी आणि राज्याच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आमदार चिमणराव पाटील, दत्तात्रय उगले, डॉ. प्रदीप इंगोले, गणेश शिंदे, संजीव भोर, अधिष्ठाता (कृषी) डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, कुलसचिव प्रमोद लहाळे, नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार आणि विद्या शाखेच्या उपकुलसचिव श्रीमती आशा पाडवी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या