Header Ads Widget

चिखलदऱ्यात होणार विदर्भस्तरीय पत्रकार संमेलन

  *तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विलास पाटील यांची माहिती
  गौरव प्रकाशन वृत्त संकलन

  अमरावती (प्रतिनिधी) : तानुबाई बिर्जे पत्रकार परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने चिखलदरा येथे भव्य विदर्भस्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून या एक दिवसीय संमेलनामध्ये देशातील नामवंत पत्रकार विविध विषयांवर आपली भूमिका मांडणार आहे.

  या माध्यमातून सध्या देशामध्ये सुरू असलेल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील अडचणी आणि समस्या यावर गांभीर्यपूर्वक चर्चा होणार आहे अशी माहिती तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विलास पाटील मुंबई यांनी नुकतीच मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दिली. सिंदखेडराजा येथे विलास पाटील यांनी अमरावती जिल्ह्यातील तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती केल्या. त्यावेळी त्यांनी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील पत्रकारांना एका विचार पिठावर आणून त्या माध्यमातून पत्रकार आणि पत्रकारिता या विषयांना केंद्रस्थानी ठेवून देशातील वर्तमान पत्रकारितेच्या स्थितीबद्दल चर्चा घडवून आणण्याचे ठरविले आहे.

  त्यासाठी विदर्भाच्या थंड हवेच्या ठिकाणी म्हणजेच चिखलदरा येथे विदर्भातील सर्व पत्रकारांचा मेळा भरणार असून या संमेलनाला अनेक मान्यवर पत्रकार मंडळी हजेरी लावणार आहे.दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात पत्रकारितेच्या क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयांवर मते मांडली जाणार आहे. त्याकरीता सर्व पत्रकार बांधवांनी या पत्रकार संमेलनासाठी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष विलास पाटील,मुंबई यांच्यासह अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण बोके,तालुकाध्यक्ष रवींद्र वानखडे, तालुका सचिव उमेश काकड व तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेच्या जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी केले आहे.

  --------------

  तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  -बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या