अमरावती (प्रतिनिधी) : व्यावसायिक व उद्योजक यांच्यामध्ये जागृती निर्माण होण्यासाठी उद्योग संचालनालय, मुंबई व मैत्री कक्ष मार्फत शनिवार, दि. 7 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
आय.टी. पातळीवर व नियामक पातळीवर केले जाणाऱ्या सुधारणा व शासनाने राबविलेल्या विविध सुधारणा विषयी वापरकर्त्याकडुन अभिप्राय घेण्यासाठी इज ऑफ डुइंग बिझनेस (Ease Of Doing Business) सुधारणा बद्दल सादरीकरण होणार आहे. यानंतर प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आयोजन करुन उद्योजकांचे शंका समाधान करण्यात येईल.
या कार्यशाळेसाठी अमरावती जिल्ह्यामधील औद्यौगिक संघटना प्रतिनिधी, नामांकित उद्योजक, भावी उद्योजक, सनादी लेखापाल, वास्तु रचनाकार, उद्योग व्यसायाची संबंधीत असणारे शासकीय विभागाचे अधिकारी तथा सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहे. तेव्हा या कार्यशाळे करिता प्रतिनिधींनी आपल्या उद्योजक सहकारी सोबत सकाळी 11 वाजता उपस्थित राहून कार्यशाळा यशस्वी करावी, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, यांनी केले आहे.
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या